शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur: पंधरवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात दुसरा गोळीबार; तरुणाचा जागीच मृत्यू, राजुरा हादरला

By परिमल डोहणे | Updated: July 23, 2024 21:53 IST

Chandrapur Crime News: मागील पंधरवड्यापूर्वी चंद्रपुरात गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. २३ रोजी) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राजुऱ्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रसमोर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला.

- परिमल डोहणेचंद्रपूर - मागील पंधरवड्यापूर्वी चंद्रपुरात गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. २३ रोजी) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राजुऱ्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रसमोर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. जीव वाचवण्याच्या आकांताने तो तरुणजवळील एका दुकानातील स्वच्छतागृहात शिरला. मात्र ते दोन नकाबधारी स्वच्छतागृहात जाऊन पुन्हा गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शिवज्योतसिंग देवल (२८, रा. राजुरा) असे मृतकाचे नाव आहे. सततच्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हाच हादरून गेला आहे.

शिवज्योतसिंग देवल हा ट्रकचालक होता. तो अत्यंत साधा व भजन कीर्तन करणारा तरुण म्हणून गावात प्रसिद्ध होता. मंगळवारी सात वाजताच्या सुमारास तो आपल्या वडिलांना भेटून कर्नल चौकाकडून बसस्थानक चौकाकडे येत होता. दरम्यान, बॅंक ऑफ महाराष्ट्रजवळ पोहोचताच त्याच्या मागावर असलेल्या दुचाकीवरील दोन नकाबधारी इसमानी बेधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक गोळीबार झाल्याने भांबावलेल्या अवस्थेत शिवज्योतसिंगजवळील एका दुकानातील स्वच्छतागृहात शिरला. मात्र ते नकाबधारी त्याच्या मागोमाग त्या दुकानातील स्वच्छतागृहात जाऊन त्याचा जीव जाईपर्यंत गोळ्या झाडल्या अन् लगेच दुचाकीने पसार झाला. घटनेची माहिती होताच घटनास्थळावर बघ्याची मोठी गर्दी जमली. दरम्यान, राजुराचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच शहराबाहेर जाणारे सर्व रस्त बंद केले. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

 वर्षभरापूर्वीच्या गोळीबाराची पार्श्वभूमी२४ जुलै २०२३ रोजी राजुऱ्यातील सोमनाथपूर येथे एका कोळसा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. यात पूर्वा डोहे नामक विवाहित महिलेचा नाहक बळी गेला होता. या प्रकरणात शिवज्योतसिंग देवल याचा भाऊ नवज्योतसिंग देवल याला पोलिसांनी अटक केली होती. सद्य:स्थितीत नवज्योतसिंग देवल हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच प्रकरणातून हा गोळीबार तर झाला नसावा, असा संशय व्यक्त होत आहे.

आठ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्नशिवज्योतसिंगचे देवल हा अत्यंत साध्या राहणीमान असलेला तरुण होता. मागील आठ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. सुखी आनंदाने जगत असतानाच त्यांच्या गोळीबारने मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

गोळ्या संपल्यानंतर पुन्हा गोळ्या भरल्याशिवज्योतसिंगवर गोळी झाडल्यानंतर तो एका दुकानातील स्वच्छतागृहात गेला. त्याच्या मागेच दोघे नकाबधारी त्या स्वच्छतागृहात गेले. अन् पुन्हा बेछूट गोळ्या झाडल्या. गोळ्या संपल्यानंतर त्यांनी पुन्हा बंदुकीमध्ये गोळ्या भरल्या आणि पुन्हा गोळ्या झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र नेमक्या किती गोळ्या झाडल्या हे कळू शकले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVidarbhaविदर्भ