शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur: फुफ्फुसातून आरपार घुसली सळई, डॉक्टरांनी वाचवले प्राण, चंद्रपुरातील थरारक घटना

By परिमल डोहणे | Updated: January 14, 2024 22:10 IST

Chandrapur: सेंट्रिंग काढण्याचे काम करत असताना अचानक सेट्रिंगची पाटी मजुरावर पडली. तोल गेल्याने तो मजूर कॉलमवर पडल्याने हाताच्या मागच्या बाजूने बरगड्यांमधून समोरच्या भागातील फुफ्फुसाच्याबरगड्यापर्यंत आरपार सळाख घुसल्याची थरारक घटना रविवारी दुपारी १२ वाजता नागपूर रोडवरील जनता कॉलेज चौकात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान घडली.

- परिमल डोहणेचंद्रपूर - सेंट्रिंग काढण्याचे काम करत असताना अचानक सेट्रिंगची पाटी मजुरावर पडली. तोल गेल्याने तो मजूर कॉलमवर पडल्याने हाताच्या मागच्या बाजूने बरगड्यांमधून समोरच्या भागातील फुफ्फुसाच्याबरगड्यापर्यंत आरपार सळाख घुसल्याची थरारक घटना रविवारी दुपारी १२ वाजता नागपूर रोडवरील जनता कॉलेज चौकात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान घडली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्या मजुराचे प्राण वाचवले असून मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

नंदकुमार जखराखण पंच (३२) रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर असे जखमी मजुराचे नाव आहे. जनता कॉलेज चौकात एका मोठ्या ब्लिडींगचे बांधकाम सुरु असून मोठ्या प्रमाणात मजूर कामावर आहेत. रविवारी या ब्लिडिंगच्या सेट्रिंगच्या पाट्या काढण्याचे काम मजूर करत होते. दरम्यान नंदकुमार वर चढून सेंट्रिग काढत असताना एक पाटी त्यांच्या अंगावर पडल्याने त्याचा तोल गेल्याने बाजूच्या कॉलमच्या निघालेल्या सळाखीवर तो फेकल्या गेला. सळाख बरगड्यांमधून आरपार घुसल्याचे लक्षात येताच इतर मजूर मदतीला धावले. त्यांनी कटरने सळाख कापली. याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले, नापोशी देवीदास राठोड व त्यांची चमू रुग्णवाहिका घेऊनच घटनास्थळावर पोहोचली. त्यांनी नंदकुमार याला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर कंत्राटदाराने त्याला मानवटकर रुग्णालयात दाखल केले.

शस्त्रक्रियेनंतर काढली सळाख...रुग्णाची परिस्थिती बघून मानवटकर हॉस्पिटलमधील शल्यचिकीत्सक डॉ. माधुरी मानवटकर यांनी लगेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन लगेच शस्रक्रिया केली. यावेळी फुफ्फुसाला थोडी जखम झाल्याचे समोर आले. सद्य:स्थितीत नंदकुमारची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. रुग्णालयात आलेल्या रुग्णाच्या आरपार सळाख घुसली होती. त्यामुळे लगेच शस्त्रक्रिया केली. त्याच्या फुफ्फुसाला जखम झाली आहे. सद्य:स्थितीत त्याची प्रकृती स्थिर असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.- डॉ. माधुरी मानवटकर, शल्यचिकीत्सक, चंद्रपूर

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAccidentअपघात