चंद्रपूर मनपा निवडणूक मतपत्रिकेद्वारे घ्यावी
By Admin | Updated: March 18, 2017 00:41 IST2017-03-18T00:41:28+5:302017-03-18T00:41:28+5:30
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड असल्याचा आरोप राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला.

चंद्रपूर मनपा निवडणूक मतपत्रिकेद्वारे घ्यावी
नरेश पुगलिया : निवडणूक आयोगाला निवेदन
चंद्रपूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड असल्याचा आरोप राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रातील एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी निवडणूक आयोगाला दिेलेल्या निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकाबरोबरच पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुकामध्ये ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. तर गोव्यामध्ये ईव्हीएम मशीनसोबत वीवीपीएटीचा वापर करण्यात आला. मात्र उत्तरप्रदेश व उत्तरांचल प्रदेशातील निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएमद्वारे मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात गडबडी असल्याचा आरोप केला. गोव्यामध्ये मतदान करताना आपले मत कोणाला दिले हे स्क्रीनवर दिसत होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला १३ जागा मिळविता आल्या. मात्र उत्तर प्रदेश व उत्तरांचल प्रदेशामधील निकाल अनपेक्षीत असल्यामुळे लोकांचा विश्वास डगमगला आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनबाबत लोकांचा विश्वास डगमगला आहे. त्यामुळे एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. (नगर प्रतिनिधी)
ईव्हीएम बचाव लोकशाही आघाडीचे निवेदन
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेची होणाऱ्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता मतपत्रिकेचा वापर करावा, या मागणीसह विविध मागण्याचे निवेदन ईव्हीएम बचाव लोकशाही आघाडीसह विविध पक्ष तसेच विविध संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी देण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणारी बहुतेक जनता अल्पशिक्षीत आहे. त्याना ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करणे अडचणीचे जात आहे. तसेच ईव्हीएम मशीनमध्ये पसंतीच्या उमेदवाराला मत जात नसल्याची अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे मताधिकाराचा योग्य वापर करता यावा, यासाठी मनपा निवडणुकीमध्ये मतपत्रिकेचा वापर करावा, निवडणुकीच्या काळात प्रालोभणे देणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यात याव्या. प्राचारातील खर्चावरील मर्यादा काटेकोरपणे पाळण्यात याव्या, निवडणूक प्रचारात धार्मिक बाबींचा प्रचार होऊ नये, किंवा उमेदवाराद्वारे धार्मिक कार्यक्रम होऊ नये या मागण्याचा समावेश आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रिपब्लिकन संघर्ष समितीचे अंकुश वाघमारे, माजी नगरसेवक अशोक रामटेके, महाराष्ट्र आॅफीसर्स फोरमचे शंकरराव सांगोरे, धृव करमरकर, बसपाचे जिल्हा सचिव राजू देवगडे, जितेंद्र डोहणे, संजय कन्नावार, राष्ट्रवादी सामाजिक न्यायचे अध्यक्ष महेंद्र लोखंडे, शिवराज्य पक्षाचे रामकुमार अवकापल्ली आदी उपस्थित होते.