स्वच्छता अभियानात चंद्रपूर मनपा यंदाही विदर्भातून अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:44+5:302021-01-13T05:12:44+5:30
चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अभियानात उत्तम कामगिरी केल्याने महानगर पालिकेला यंदाही क्युआयसीकडून ओडीएएफ ...

स्वच्छता अभियानात चंद्रपूर मनपा यंदाही विदर्भातून अव्वल
चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अभियानात उत्तम कामगिरी केल्याने महानगर पालिकेला यंदाही क्युआयसीकडून ओडीएएफ प्लस दर्जा प्रदान केला आहे. हा दर्जा मिळविणारी चंद्रपूर मनपा विदर्भात प्रथम ठरली आहे.
शहराला ओडीएफ प्लस दर्जा मिळाला आहे. मात्र, स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक वर्षी हा दर्जा टिकविण्याची स्पर्धा असते. एकदा दर्जा मिळाल्यानंतर ते सातत्य टिकविणे कठीण असते. मात्र महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात मनपा प्रशासनाद्वारे स्वच्छता मोहिमेकडे विशेष लक्ष देणे सुरू आहे. स्वच्छ व सुंदर शौचालयांची निर्मिती करण्यात आली. ही शौचालये गुगलद्वारे शोधता येतात. यातील सात स्वच्छतागृह आदर्श आहेत. नागरिकांना वैयक्तिक व अद्ययावत सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर शहरांना हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते. शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून शहरे स्वच्छ करण्याचा समावेश आहे. शहरात दोन्ही सुविधांची पूर्तता केल्यानंतर ओडीएफ प्लस दर्जा देण्यात आला.
सामूहिक प्रयत्नांचे फलित
चंद्रपूर शहराला मिळालेले हे यश प्रशासनातील सर्व घटकांच्या सामुहकि प्रयत्नांचे फ लित आहे. यापुढेही उत्कृष्ट कामगिरी बजावण्याचा संकल्प महानगर पालिकाने केला आहे. यासाठी मनपाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे सहकार्य उपयुक्त ठरले, अशी माहिती महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली.