चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज गुरुवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांच्या कालावधीत एकूण ६.४६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अकुनुरी नरेश (भा.प्र.से.) यांनी दिली.
महानगरपालिकेतील एकूण २ लाख ९९ हजार ९९४ मतदारांपैकी १९ हजार ३६८ मतदारांनी पहिल्या दोन तासांत आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ११ हजार ७०३ पुरुष व ७ हजार ६६५ महिला मतदारांचा समावेश आहे.
वॉर्डनिहाय मतदानाची स्थिती
सकाळच्या सत्रात भीवापूर प्रभाग सर्वाधिक ९.२६ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (८.१८ टक्के), हिंदुस्थान लालपेठ कॉलरी (७.४४ टक्के), बंगाली कॅम्प (७.१० टक्के) आणि भानापेठ (७.०९ टक्के) येथे चांगला प्रतिसाद दिसून आला.
तर जटपुरा (४.९७ टक्के), नागीनाबाग (५.१५ टक्के) आणि वडगाव (५.४३ टक्के) वॉर्डमध्ये तुलनेने मतदानाचा टक्का कमी नोंदविण्यात आला.
शांततेत मतदान
मतदान प्रक्रिया सर्व वॉर्डमध्ये शांततेत आणि सुरळीत सुरू असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Web Summary : Chandrapur's municipal elections began with 6.46% voter turnout in the first two hours. Bhiwapur ward recorded the highest percentage. Authorities anticipate increased participation later. Polling is proceeding peacefully.
Web Summary : चंद्रपुर महानगरपालिका चुनाव में पहले दो घंटों में 6.46% मतदान हुआ। भिवापुर वार्ड में सबसे अधिक प्रतिशत दर्ज किया गया। अधिकारियों को बाद में अधिक भागीदारी की उम्मीद है। मतदान शांतिपूर्वक चल रहा है।