शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
2
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
4
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
5
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
6
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
7
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
8
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
9
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
10
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
11
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
12
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
13
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"
14
महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान
15
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
16
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
17
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
18
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
19
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
20
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य

Chandrapur Lok Sabha Results 2024 : प्रतिभा धानोरकर पहिल्याच प्रयत्नात दोन्ही परीक्षा पास; आधी आमदार आणि आता खासदारकीकडे वाटचाल

By साईनाथ कुचनकार | Updated: June 4, 2024 16:38 IST

Chandrapur Lok Sabha Results 2024 : पतीच्या निधनानंतर न डगमगता कार्य सुरूच ठेवले

साईनाथ कुचनकार/ चंद्रपूरChandrapur Lok Sabha Results 2024 :   दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अर्धांगिनी प्रतिभा धानोरकर यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदाच वरोरा विधानसभा निवडणूक लढविली आणि त्या निवडून आल्या. त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पतीच्या निधनानंतर न डगमगता आपले कार्य सुरूच ठेवले. २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविली. 

प्रतिभा धानोरकर यांचा जन्म ९ जानेवारी १९८६ रोजी वणी तालुक्यातील परमडोह येथे झाला. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत विवाह झाला. सासरी राजकीय वातावरण असल्याने प्रतिभा धानोरकर यांना सामाजिक तसेच राजकीय बाळकडू येथेच मिळाले. प्रथम सामाजिक कार्याबरोबरच राजकीय कार्यातही भाग घ्यायला त्यांनी सुरुवात केली. पती बाळू धानोरकर हे शिवसेनेकडून आमदार झाले. त्यावेळी त्यांनी सक्रिय प्रचारात सहभाग घेतला. त्यानंतर २०१९ मध्ये बाळू धानोरकर हे काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि वरोरा विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीमध्ये त्या विजयी झाल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार झाल्या. त्यानंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्रात शक्ती कायदा व्हावा यासाठी नागपूर अधिवेशनात त्यांनी प्रथम मागणी केली. तृतीयपंथींना आरक्षणासाठीही त्यांनी मागणी केली.

पतीच्या निधनानंतर लोकसभा क्षेत्रात सक्रीयपतीच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्राकडे लक्ष देणे सुरू केले. त्यांनी आर्णीपासून तर जिवतीपर्यंत क्षेत्र पिंजून काढले. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची काँग्रेसने उमेदवारी दिली.

संघर्ष जितका मोठा  तितका विजय मोठाप्रचाराच्या दरम्यान मी सातत्याने स्टेटस ठेवले होते की संघर्ष जेवठा मोठा राहील तेवढाच विजय शानदार राहील. त्यामुळे ऐतिहासिक विजय हा चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्रात झाला आहे. हा माझा विजय नसून जनतेचा, सामान्यांचा, शेतकऱ्यांचा विजय आहे. भाजप सरकारला जनता कंटाळली होती. जनतेला परिवर्तन पाहिजे होते. त्यामुळे जनतेने महाविकास आघाडीला पसंती दिली.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूर