शंकरपूर : वाघांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात २०२५ या वर्षात मानव-वन्यजीव संघर्षाने भयावह स्वरूप धारण केले. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल ४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर विविध कारणांमुळे १२ वाघ व ५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. या आकडेवारीमुळे चंद्रपूर जिल्हा मानव-वन्यजीव संघर्षाच्या बाबतीत देशात अग्रस्थानी पोहोचल्याचे वास्तव समोर आले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला हा जिल्हा, आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या मानवी बळींमुळे ओळखला जाऊ लागला आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत २६ लोकांचा बळी गेला आहे. तर १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत २९ लोकांचा बळी गेला आहे. या दोन्ही वर्षांच्या तुलनेत यावर्षी ही वाढ दीड पटीने झालेली आहे त्यामुळे वाघासाठी प्रसिद्ध असलेला हा चंद्रपूर जिल्हा आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या बळीमध्ये भारतात अग्रस्थान निर्माण करीत आहे.
वनविभागासमोर मोठे आव्हान
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूची संख्या काहीशी कमी असली, तरी मानवी बळींच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ ही वनविभागासाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. वाढते जंगलालगतचे मानवी वस्ती क्षेत्र, रोजगारासाठी जंगलावर अवलंबून असलेले नागरिक, अपुरे प्रतिबंधात्मक उपाय आणि सतर्कतेचा अभाव या कारणांमुळे संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. गोंडपिपरी व चिमूर तालुक्यात तर वनविभागाविरोधात आंदोलनही करण्यात आले होते.
वनविभागानुसार मानवी मृत्यू
मध्य चांदा वनविभाग : ३ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : ११ब्रह्मपुरी वनविभाग : १९एफडीसीएम : ३चंद्रपूर प्रादेशिक वनविभाग : ११एकूण मृत्यू: ४७
बिबट मृत्यू : ५मध्य चांदा : १ब्रह्मपुरी : ३चंद्रपूर : १
वाघ मृत्यू: १२मध्य चांदा : १चंद्रपूर : १ताडोबा : ५एफडीसीएम : १ब्रह्मपुरी : ४
Web Summary : Chandrapur faces a severe human-wildlife conflict. In 2025, 47 people died due to wild animal attacks, with 12 tiger and 5 leopard deaths recorded. Increased human encroachment and lack of preventive measures intensify the crisis.
Web Summary : चंद्रपुर में मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर है। 2025 में, जंगली जानवरों के हमलों से 47 लोगों की मौत हो गई, साथ ही 12 बाघ और 5 तेंदुए भी मारे गए। बढ़ता हुआ मानवीय अतिक्रमण और निवारक उपायों की कमी संकट को बढ़ा रही है।