चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यात्रा २७ मार्चपासून

By राजेश भोजेकर | Published: March 16, 2023 04:11 PM2023-03-16T16:11:54+5:302023-03-16T16:15:56+5:30

जिल्हा व महापालिका प्रशासनाची तयारी सुरू

Chandrapur Goddess Mahakali Yatra From 27th March | चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यात्रा २७ मार्चपासून

चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यात्रा २७ मार्चपासून

googlenewsNext

चंद्रपूर : आराध्य दैवत माता महाकाली यात्रा २७ मार्चपासून सुरू होत आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यातील भक्तांसह मराठवाडा, तेलंगणा व आंध्र प्रदेशातील भक्तांची यात्रेत गर्दी होते. त्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सर्व संबंधित यंत्रणा व महाकाली देवस्थान विश्वस्त मंडळाची आढावा बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपविभागीय पोलिस अधिकारी एस.पी.नंदनवार, पोलिस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, वाहतुक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, अन्न व औषध विभागाचे नितीन मोहिते, वेकोलीचे व्यवस्थापक आर. के. सिंग, महाकाली देवस्थानचे विश्वस्त सुनील महाकाले उपस्थित होते.

Web Title: Chandrapur Goddess Mahakali Yatra From 27th March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.