ओबीसींच्या घटनादत्त अधिकारांसाठी चंद्रपुरात घंटानाद आंदोलन

By Admin | Updated: August 26, 2016 00:59 IST2016-08-26T00:59:37+5:302016-08-26T00:59:37+5:30

ओबीसींच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या वतीने आज गुरुवारी घंटानाद व डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले.

Chandrapur Ghantanad movement for OBC constitutional rights | ओबीसींच्या घटनादत्त अधिकारांसाठी चंद्रपुरात घंटानाद आंदोलन

ओबीसींच्या घटनादत्त अधिकारांसाठी चंद्रपुरात घंटानाद आंदोलन

निवेदन सादर : डफडे वाजवून शासनाच्या धोरणाचा निषेध
चंद्रपूर : ओबीसींच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या वतीने आज गुरुवारी घंटानाद व डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. नियोजनानुसार आमदार व खासदारांच्या घरासमोर हे आंदोलन होणार होते. मात्र पोलिसांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासमोर आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जटपुरा गेटपर्यंतच्या मार्गावर घंटानाद व डफडे वाजवून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
वर्तमान भाजप सरकारने ओबीसी आरक्षणामध्ये कपात केली आहे. युपीएएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३१४ पैकी १२० ओबीसी उमेदवारांना प्रशिक्षणाकरिता पोस्टींग देण्यात आली नाही, याचा विरोध करण्यासाठी व आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले. आज सकाळी ९ वाजता राजुऱ्याचे आमदार संजय धोटे यांच्या घरासमोर घंटनाद व डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तशी परवानगी दिली नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित झाले. तिथून जटपुरा गेटवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत घंटानाद व डफडे बजाओ आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी हजारो पत्रके वाटून नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात आली.
ओबीसी फेडरेशनचे संयोजक व सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचे आकडे घोषित करा, दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत ओबीसी जनगणना करा, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप द्या, ओबीसींना प्रमोशनमध्ये आरक्षण द्या, नॉन क्रिमीलेअरची घटनाबाह्य अट रद्द करा या मागण्यासंदर्भात घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनात भास्कर मून, हिराचंद बोरकुटे, प्रा. माधव गुरुनुले, नितीन भटारकर, ल.वि. घामी, राजकुमार जवादे, विनोद सोनटक्के, शैलेश लोखंडे, डी.के. आरीकर, डॉ. बाळकृष्ण भगत, दिलीप होरे, राकेश कालेशवार, सरपंच अमोल ठाकरे, सतीश निमसरकर, संदीप पिंपळकर, संदीप रोहणे व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Chandrapur Ghantanad movement for OBC constitutional rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.