चंद्रपूर किल्ला पर्यटन यंदाच्या मोसमाचे शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:57+5:302021-01-25T04:28:57+5:30

बगड खिडकी ते अंचलेश्वर मंदिरपर्यंत किल्ल्याची फुलांनी सजावट चंद्रपूर : इको-प्रोच्या ९०० दिवस स्वच्छतेसोबत किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक सुरू करण्यात ...

Chandrapur Fort Tourism launches this season | चंद्रपूर किल्ला पर्यटन यंदाच्या मोसमाचे शुभारंभ

चंद्रपूर किल्ला पर्यटन यंदाच्या मोसमाचे शुभारंभ

बगड खिडकी ते अंचलेश्वर मंदिरपर्यंत किल्ल्याची फुलांनी सजावट

चंद्रपूर : इको-प्रोच्या ९०० दिवस स्वच्छतेसोबत किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक सुरू करण्यात आले होते. कोरोनानंतर यंदाच्या मोसमात 'चंद्रपूर किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक' या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी सकाळी ६.३० वाजता करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महानगरपालिकाचे अधिकारी, तहसील कार्यालय, शासकीय रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, रोटरी क्लब, हनुमान मंदिर समिती सदस्य यांच्यासह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

याप्रसंगी राहुल कर्डिले म्हणाले, बरेचदा आपला समृद्ध वारसा असून, विसर पडतो. या हेरिटेज वॉकसारखा उपक्रम वास्तू, माहितीसोबत आपला ऐतिहासिक वारसा संवर्धनकरिता आवश्यकता असल्याची भावना निर्माण होईल. वास्तू संवर्धनासाठी महत्त्वाचे ठरेल व पुढील विकास होईल, असे सांगितले, तर विद्युत वरखेडकर यांनी स्थानिक इतिहास जाणून घेण्याचा दृष्टीने हेरिटेज वॉक उपक्रमास महत्त्व आहे, अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपला इतिहास जाणून घेत स्थानिक वारसा संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

कोरोना आपदा मुळे इको-प्रोच्या किल्ला स्वच्छता आणि किल्ला पर्यटनात खंड पडला होता. हेरिटेज वॉक सुरू करण्यापूर्वी मागील एक महिनापासून नियमित स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ करण्यात आला. किल्ला पर्यटन शुभारंभ करण्यात किल्ल्याचे भिंत, बगड खिडकी आणि बुरुज फुलांनी सजावट करण्यात आली. सकाळी ६ वाजता पर्यटन सुरू होणार असल्याने अगदी पहाटेपासून किल्ला सजावट सुरू झाली होती. हेरिटेज वॉकमधील सर्व बुरुज खिडक्या सजविण्यात आलेल्या होत्या.

किल्ला पर्यटन दरम्यान इकोचे बंडू धोतरे व अन्य सदस्यांनी गोंडकालीन चंद्रपूरचा इतिहास, स्मारक याबाबत माहिती दिली. यावेळी महानगरपालिका सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, विद्या पाटील, नायब तहसीलदार सचिन पाटील, गादेवार, सीआयएसएफचे कमांडर मतादिन मीना, धिरेंद्र मूलकलवार, रोटरीचे मनीष बोराडे, संतोष तेलंग यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

शासकीय रक्तपेढीचे अमोल जिद्दीलवार, वासू आणि अन्य कर्मचारी, हनुमान मंदिर समिती आशिष अलचलवार आणि सदस्य तसेच इको-प्रोचे नितीन रामटेके, धर्मेंद्र लुनावत आदी सदस्य सहभागी होते.

Web Title: Chandrapur Fort Tourism launches this season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.