शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur: सासऱ्याची चाकू भोसकून हत्या; तर सासूला केले जखमी, जावयास आजन्म करावास, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

By परिमल डोहणे | Updated: May 12, 2023 14:57 IST

Chandrapur Crime News: सासऱ्याची चाकू भोसकून हत्या करून सासूला जखमी करणाऱ्या जावयास जिल्हा सत्र न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आजन्म कारावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली.

- परिमल डोहणे

चंद्रपूर - सासऱ्याची चाकू भोसकून हत्या करून सासूला जखमी करणाऱ्या जावयास जिल्हा सत्र न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आजन्म कारावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. निलकंठ यशवंत कांबळे (30) रा. हिरापूर तालुका सावली असे शिक्षा झालेल्या जावयाचे नाव आहे. ईश्वर मडावी मृत सासऱ्याचे तर कौशल्याबाई मडावी जखमी सासूचे नाव आहे.

निलकंठ कांबळे व मनीषा मडावी या दोघांच्या प्रेम विवाहाला घरचा विरोध होता. मनीषा तंटामुक्त समितीमध्ये गेल्याने समितीच्या पुढाकाराने त्यांचा प्रेम विवाह झाला होता. काही दिवस दोघे पती पत्नी किसाननगर येथे वास्तव्यास राहिल्यानंतर ते आपल्या सासऱ्याकडे हिरापूर येथे राहायला गेले. 16 डिसेंबर 2019 रोजी मनीषा व तिचा पती झोपडी बांधण्यासाठी लाकडे आणायला जंगलात गेले यावेळी नीलकंठने मनीषाला तू तंटामुक्त समितीमध्ये का गेली, या कारणावरून वाद करत तिला मारहाण केली. त्यामुळे ती एकटीच घरी गेली. दरम्यान काही वेळाने निलकंठही सासऱ्याच्या घरी गेला. यावेळी घरी सर्वजण जेवण करत होते. नीलकंठने वाद घालत सासऱ्याला चाकूने भोसकले तर पतीच्या बचावासाठीमध्ये आलेल्या सासूवरही नीलकंठने वार केला. यात सासरा ईश्वर मडावी याचा मृत्यू झाला तर सासू कौशल्याबाई  जखमी झाली.

मुलीच्या तक्रारीवरून सावली पोलिसात कलम 302, 307 अन्वये गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी तत्कालीन एसडीपिओ अनुज तारे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यानीशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणाचा निकाल देताना जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.अनिता नेवासे यांनी आरोपी निलकंठ कांबळे याला कलम 302 अन्वये आजन्म कारावास व दहा हजार रुपयांचा दंड तर कलम 307 मध्ये आजन्म कारावास व पाच हजार रुपयांचा दंड थोटावला. सरकारी वकील म्हणून ॲड. सुधाकर डेगावार तर  कोर्ट पैरवी म्हणून नापोका सपना बेल्लावार यांनी काम बघितले.

टॅग्स :Courtन्यायालयjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारी