शिवरायांच्या जयघोषाने चंद्रपूर दुमदुमले

By Admin | Updated: March 28, 2016 00:51 IST2016-03-28T00:51:29+5:302016-03-28T00:51:29+5:30

शिवसेनेतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली.

Chandrapur Dumdumale Shivaji Maharaj | शिवरायांच्या जयघोषाने चंद्रपूर दुमदुमले

शिवरायांच्या जयघोषाने चंद्रपूर दुमदुमले

शिवसेनेतर्फे आयोजन : चंद्रपुरात विविध कार्यक्रम
चंद्रपूर : शिवसेनेतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.
पठाणपुरा गेट येथून शोभायात्रा काढण्यात आली. आ. बाळू धानोरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, उपजिल्हाप्रमुख तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर जोरगेवार, महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारती दुधाणी, युवासेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे, महिला आघाडी शहर प्रमुख सायली येरणे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख माया पटले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच विधिवत पूजन करण्यात आले.
शिवरायांच्या जयघोष करीत पठाणपुरा गेट ते गांधी चौक, जटपुरा गेट ते कस्तुरबा चौक या चंद्रपूर शहराच्या मुख्य मार्गाने शोभायात्रा फिरविण्यात आली.
शोभायात्रेत ढोलताशा पथक, लेझीम पथक, भजन मंडळ, आखाडा पथक, बँड पथक, शिवचरित्र्यावर आधारित देखावे, छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरले.
या आकर्षक आतषबाजीही करण्यात आली. शोभायात्रेत माजी जिल्हा प्रमुख दीपक दापके, दिलीप कपूर, अजय वैरागडे, अजय स्वामी, नगरसेवक आकाश साखरकर, माजी उपमहापौर संदीप आवारी, नगरसेवक बंडू हजारे, विनयकुमार जोगेकर, योगिता मडावी, उपशहर प्रमुख अशोक खडके, नितीन नागरीकर, अमोल शेंडे, लहू मरस्कोल्हे, कैलाश धायगुडे, आनंद ठाकुर, शेखर मासगोनवार, राजेश अधिकारी, शाहरूख शेख, शाम हेडाऊ, नीलेश बेलखेडे, प्रतीक शिवणकर, प्रफुल पुलगमकर, विलास वनकर, माला तुरारे, शांता धांडे, रजनी चिंचोळकर, अ‍ॅड. कांचन दाते, शीतल बोबाटे, विजया बच्छाव व शेकडो शिवसैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आयोजनाकरिता विनोद गोल्लजवार, विलास सोमलवार, सुधीर माजरे, मुन्ना जोगी, मनोहर जाधव, जंगलु पाचभाई, दर्शन बुरडकर, संदीप महाजन, किशोर बोल्लमवार यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Chandrapur Dumdumale Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.