लसीकरण मोहीमेत चंद्रपूर जिल्‍हा देशात अव्‍वल ठरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST2021-04-07T04:29:38+5:302021-04-07T04:29:38+5:30

भारतीय जनता पार्टीच्‍या स्‍थापना दिनानिमित्‍त आ. मुनगंटीवार यांनी ऑडीओ ब्रिजच्‍या माध्‍यमातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांशी संवाद साधला. यावेळी आ. ...

Chandrapur district should be the first in the country in vaccination campaign | लसीकरण मोहीमेत चंद्रपूर जिल्‍हा देशात अव्‍वल ठरावा

लसीकरण मोहीमेत चंद्रपूर जिल्‍हा देशात अव्‍वल ठरावा

भारतीय जनता पार्टीच्‍या स्‍थापना दिनानिमित्‍त आ. मुनगंटीवार यांनी ऑडीओ ब्रिजच्‍या माध्‍यमातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांशी संवाद साधला. यावेळी आ. मुनगंटीवार म्‍हणाले, भारतीय जनता पार्टी देशातील सर्वात जास्‍त सदस्‍य संख्‍या असलेली पार्टी आहे. या देशातील गोरगरिबांचे कल्‍याण ही प्राथमिकता आहे. भयमुक्‍त भारत, भूकमुक्‍त भारत, विषमतामुक्‍त भारत, नक्षलवादमुक्‍त भारत, आतंकमुक्‍त भारत, रोजगारयुक्‍त भारत, वैभवशाली भारत हे भारतीय जनता पार्टीचे ध्‍येय आहे. सेवा, संघर्ष, संघटन, संवाद, विकास ही आमची पंचसूत्री आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. कोरोनाच्‍या या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आपली व आपल्‍या परिवाराची काळजी घेत नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.

संवाद सेतूचे प्रास्‍ताविक भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. यावेळी भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी आभार मानले. यावेळी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडु, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, महापौर राखी कंचर्लावार, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, सरचिटणीस सुभाष कासनगोट्टुवार, ब्रिजभुषण पाझारे, प्रज्‍वलंत कडु, सुरज पेदुलवार यांची उप‍स्थिती होती.

Web Title: Chandrapur district should be the first in the country in vaccination campaign