शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

पायाभूत प्रकल्पांमुळे चंद्रपूर बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:45 IST

चंद्रपुरात उभ्या राहत असलेल्या मोठमोठ्या पायाभूत सुविधा, रोजगार निर्मितीसाठी उभे होणारे प्रकल्प, मिशन शौर्यसारखे अभिनव प्रयोग सुरू आहेत. यामुळे जिल्हा बदलला. माझ्या पंजाब या राज्यात देखील असाच एखादा नेता असावा, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी मंगळवारी काढले.

ठळक मुद्देसोनू सूद : पालकमंत्री फुटबॉल चषक वितरण, नागपूरचा संघ विजेता तर चंंद्रपूर उपविजेता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात उभ्या राहत असलेल्या मोठमोठ्या पायाभूत सुविधा, रोजगार निर्मितीसाठी उभे होणारे प्रकल्प, मिशन शौर्यसारखे अभिनव प्रयोग सुरू आहेत. यामुळे जिल्हा बदलला. माझ्या पंजाब या राज्यात देखील असाच एखादा नेता असावा, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी मंगळवारी काढले.राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांमार्फ त दुगार्पूर शक्तीनगर येथे पालकमंत्री फुटबॉल चषक घेण्यात आली. राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये नागपूरचा संघ विजेता तर चंद्र्रपूरचा संघ उपविजेता ठरला. या संघांना पुरस्कार वितरणासाठी सिने अभिनेता सोनू सूद आले होते.मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, डब्ल्यूसीएलचे महाव्यवस्थापक आभा सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, रामपाल सिंग आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सोनू सूद यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांचे तोंडभरून कौतुक केले. मी मूळचा पंजाब राज्याचा रहिवासी आहे. मात्र पंजाबमध्येदेखील अशा पद्धतीचा विकास कामाचा झंझावात मला बघायला मिळाला नाही. ना. मुनगंटीवार यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास कामांना बघून मी अतिशय प्रभावीत झालो आहे. मला अतिशय प्रामाणिकपणे याठिकाणी सांगावेसे वाटते की, असा एखादा नेता माझ्या पंजाब प्रांतामध्ये का दिला नाही, असेही अभिनेता सोनू सुद म्हणाले. नागरिकांनी आग्रह केल्याने त्यांनी त्याच्या आगामी चित्रपटातील काही संवादही त्यांनी सादर केले. नागपूर, चंद्रपूर, बल्लारपूर या शहरांशी आपला परिचय असल्याचे सांगत त्यांनी नागपूरशी माझे नाते असल्याचे नमूद केले. अभियांत्रिकीचे शिक्षण नागपुरातच पूर्ण केले. त्यामुळे बल्लारपूरात अनेक मित्र आहेत. हा परिसर आपल्या परिचयाचा आहे. ना. मुनगंटीवार यांनी बोलावल्यास चंद्रपूरला पुन्हा भेट देऊ असेही सोनू सुद यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबूपासून बनवलेली तलवार देऊन सोनू सूद यांचे जिल्ह्यातर्फे स्वागत केले. दुर्गापूर येथील शक्ती नगर भागातील समता स्पोर्टिंग क्लबच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या क्लबतर्फे फारुक शेख, श्रीकांत देशमुख, संजय यादव, घनश्याम यादव आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले.ऊर्जा देणारे शहर-मुनगंटीवारचंद्रपुरात शहरात आलेल्या प्रत्येक माणसाला येथून ऊर्जा मिळते. शहरातील कोळशामध्ये कर्तृत्वाचे हिरे तयार होतात. आॅपरेशन शौर्यमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा केलेल्या भीम पराक्रम केला. सोनू सूद यांना माता महाकालीचे आशीर्वाद प्राप्त होवोत. आगामी काळात त्यांच्या चित्रपट क्षेत्रामध्ये यश मिळो.