चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 16:41 IST2018-03-22T16:41:04+5:302018-03-22T16:41:14+5:30
ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बिट अंतर्गत सीतेच्या नाणंही जवळ पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरु वारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बिट अंतर्गत सीतेच्या नाणंही जवळ पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरु वारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तरु ण पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य निसर्गभ्रमंतीवर असताना ही घटना उघड झाली. यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. याच ठिकाणी बुधवारीही एक बिबट मृतावस्थेत आढळला होता. या घटनास्थळापासून केवळ अर्ध्या किमीवर आज दुसरा बिबट मृतावस्थेत आढळला. मंगळवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये एक बिबट मृतावस्थेत आढळला होता. तीन दिवसात तीन बिबटांचा मृत्यू झाला आहे.