शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

८५ वर्षीय आजोबांचा अनोखा विक्रम; पाण्यात ३७ प्रकारचे योग, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 11:53 IST

एकूण ३७ प्रकारचे योग त्यांनी एका तासाच्या कालावधीत पाण्यात उपस्थितांसमोर करून दाखविले.

चंद्रपूर : मनात ठाणलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही याची प्रचिती या आजोबांकडे पाहून येईल. त्यांनी जलतरण तलावात एक-दोन नव्हे तर ३७ प्रकारचे योग प्रकार  एका तासाच्या कालावधीत करून दाखवले. त्यांच्या या अनोख्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् करण्यात आली आहे.

८५ वर्षीय जलयोग साधक कृष्णराव नागपुरे यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंदविले गेले. रविवारी इंडिया बुक ऑफ रेकार्डने पाण्यातील योगासाठी त्यांची चंद्रपूर येथे येऊन नोंद घेतली. जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलावामध्ये २४ प्रकारची योग प्रात्यक्षिके करून दाखविली. याशिवाय १३ प्रकारचे पाण्यातील विविध पोहण्याचे प्रकार करून दाखविले.

एकूण ३७ प्रकारचे योग त्यांनी एका तासाच्या कालावधीत पाण्यात उपस्थितांसमोर करून दाखविले. त्यांचे ८० वर्षांच्या पुढील लोकांच्या पाण्यातील योगाच्या सर्वांत जास्त कवायती यासंदर्भात इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नाव नोंदविले गेले. कार्यक्रमामध्ये कृष्णराव नागपुरे गुरुजी यांचा इंडिया बुक ऑफ रेकार्डतर्फे पदक, प्रमाणपत्र आणि टेन देऊन गौरव करण्यात आला. संचालन श्रीहरी शेंडे, आभार सुवर्णा नागपुरे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :SocialसामाजिकYogaयोगासने प्रकार व फायदेSenior Citizenज्येष्ठ नागरिकSwimmingपोहणेchandrapur-acचंद्रपूर