चंद्रपूर @ ४६.८
By Admin | Updated: May 20, 2015 01:49 IST2015-05-20T01:49:01+5:302015-05-20T01:49:01+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात आता सुर्याचा पारा चांगलाच चढू लागला आहे.

चंद्रपूर @ ४६.८
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आता सुर्याचा पारा चांगलाच चढू लागला आहे. मागील दोन दिवसांपासून अचानक उन्हाची काहिली वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज जिल्ह्यात कमाल ४६.८ तर किमान २८.९ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. या उन्हाळ्यातील आजपर्यंतचे हे सर्वात अधिक तापमान होते. या तापमानामुळे चंद्रपूरकर अक्षरश: होरपळून निघाले.
चंद्रपूर जिल्ह्यात मार्चअखेर उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. मात्र एप्रिलमध्ये अचानक अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अनेक दिवस ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती. दरम्यान मे महिन्या काही दिवस तीव्र ऊन तर काही दिवस ढगाळ वातावरण राहिले. मात्र आता मागील दोन दिवसांपासून सुर्याचा पारा चढू लागला आहे. दुपारची उन्ह असह्य होऊ लागल्याने रस्त्यावरची वर्दळही कमी झाली आहे.आज तर सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)