चंद्रपुरात २ हजार ४०४ नागरिकांचा नियमांना ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST2020-08-26T05:00:00+5:302020-08-26T05:00:56+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील मागील काही दिवसामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पंधराशेच्यावर रुग्ण संख्या गेली आहे. यातही महापालिका क्षेत्रामध्ये हा आकडा मोठा आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनानेही आता कठोर पाऊल उचलने सुरु केले आहे. या अंतर्गत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणे, तोंडाला मास्क न लावता शहरात फिरणे अशा बेफीकरी नागरिकांमुळे रुग्णसंख्या वाढत आहे.

चंद्रपुरात २ हजार ४०४ नागरिकांचा नियमांना ठेंगा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध घातले असून विविध उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. असे असले तरी काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. रस्तावर थुंकणे, मास्क न बांधणे, खर्रा विक्री करणे, विना परवाना दुकान चालविणे आदी कारनामे सुरुच ठेवल्यामुळे महापालिका प्रशासनाने यावर आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. यामध्ये २ हजार ४०४ नागरिकांकडून ४ लाख ९३ हजार ८९० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मागील काही दिवसामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पंधराशेच्यावर रुग्ण संख्या गेली आहे. यातही महापालिका क्षेत्रामध्ये हा आकडा मोठा आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनानेही आता कठोर पाऊल उचलने सुरु केले आहे. या अंतर्गत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणे, तोंडाला मास्क न लावता शहरात फिरणे अशा बेफीकरी नागरिकांमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठावून प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शहरातील काही व्यावसायिकही मनपाने आखून दिलेल्या उपाययोजनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांवरही मनपाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. दुकानदार, प्रतिष्ठाने तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे.
सदर कारवाई सहाय्यक आयुक्त शितल वाकडे, धनंजय सरनाईक, विद्या पाटील यांच्या नेतृत्वात झोनचे क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे, सुभाष ठोंबरे, अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत तसेच स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भुपेश गोठे, विवेक पोतनुरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे, संतोष गर्गेलवार, जगदीश शेंदरे यांच्याद्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात करण्यात आले आहे. दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून सुरक्षिततेसाठी मास्क लावावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.