चंद्रकांत थोटवे महानिर्मितीच्या संचालकपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:26 IST2021-03-21T04:26:26+5:302021-03-21T04:26:26+5:30
विशेष म्हणजे सेवेदरम्यान ते संचालक (संचलन) होते. हल्ली सेवानिवृत्तीनंतरही त्यांना दुसऱ्यांदा याच पदाचा कार्यभार सांभाळण्याची संधी मिळाली आहे. ...

चंद्रकांत थोटवे महानिर्मितीच्या संचालकपदी
विशेष म्हणजे सेवेदरम्यान ते संचालक (संचलन) होते. हल्ली सेवानिवृत्तीनंतरही त्यांना दुसऱ्यांदा याच पदाचा कार्यभार सांभाळण्याची संधी मिळाली आहे.
महानिर्मितीचा दांडगा अनुभव असलेले चंद्रकांत थोटवे संचालक (संचलन) पदावर असताना ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांचे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या पदाचा पदभार महानिर्मितीतील कार्यकारी संचालक राजू बुरडे यांच्यावर सोपविण्यात आला होता. दरम्यान, मुंबई महानिर्मितीतील सदर पद भरण्याकरिता एमएसईबी होल्डिंग कंपनीने खुली जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानुसार रीतसर अर्ज करण्यात आले. यात पात्र असलेल्या नऊ लोकांना मुलाखतीकरिता बोलाविण्यात आले होते. या पदाकरिता फेब्रुवारी महिन्यामध्ये मुलाखती घेण्यात आल्या. यात सात जणांचा समावेश होता.
यापैकी चंद्रकांत थोटवे यांची मुंबई महानिर्मितीमध्ये संचालक (संचलन) पदी निवड झाली.