Chance of an accident due to open Rohitra | उघड्या रोहित्रामुळे अपघाताची शक्यता

उघड्या रोहित्रामुळे अपघाताची शक्यता

अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री सुरूच

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले, तरी काही ठिकाणी उघड्यावरच अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे, आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता

चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने स्लीप होऊन अपघात होत आहे. काही नागरिकांनी घराचे बांधकाम करण्यासाठी अगदी रस्त्यावरच बांधकाम साहित्य ठेवत आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी

चंद्रपूर : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिल्या जात आहे, परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने, बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अतिक्रमणामुळे वाहतुकीची खोळंबा

चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिकेने अतक्रिमण हटाव मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

झोपडपट्टी परिसराचा विकास करावा

चंद्रपूर : दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे वाट्टेल तिथे घर बांधून नागरिक राहतात. विशेषत: झोपडपट्टीचा परिसरही वाढत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना किमान सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

पक्ष्यांसाठी ठेवत आहे पात्रात पाणी

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यातच जलाशयही आता आटत असल्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळावे, यासाठी शहरातील काही नागरिक पात्रामध्ये पाणी भरून ते पक्ष्यांसाठी ठेवत आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे पक्षांची काही प्रमाणात का होईना, तहान भागत आहे.

परवानगी घेण्यासाठी नागरिकांची धावपळ

चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध पावले उचलली जात आहेत. कार्यक्रमांवरही बंदी आली असून, परवानगी घ्यावी लागत आहे. त्यामुळे नागरिक परवानगी घेण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.

झाडांना सकाळच्या वेळेस पाणी टाकावे

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या झाडांना कंत्राटदारामार्फत पाणी टाकले जात आहे. मात्र, सदर पाणी सकाळी ११, तसेच दुपारीही टाकले जात आहे. त्यामुळे झाडांना फायदा होण्यापेक्षा नुकसानच होत आहे. त्यामुळे पाणी टाकताना सकाळच्या वेळी पाणी टाकावे, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Chance of an accident due to open Rohitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.