नगर परिषदेसाठी घुग्घुसमध्ये चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:13+5:302020-12-29T04:28:13+5:30
घुग्घुस : सर्व पक्षीय नगरपरिषद स्थापना समिती घुग्गुसच्या वतीने घुग्घुस नगर परिषदेच्या स्थापनेच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजतादरम्यान बसस्थानकजवळ ...

नगर परिषदेसाठी घुग्घुसमध्ये चक्का जाम आंदोलन
घुग्घुस : सर्व पक्षीय नगरपरिषद स्थापना समिती घुग्गुसच्या वतीने घुग्घुस नगर परिषदेच्या स्थापनेच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजतादरम्यान बसस्थानकजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळून एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सोमवारी सकाळी सर्वपक्षीय स्थापना समितीचे नेते ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात एकत्र आले. तिथून गांधी चौक, जुना बस्थानक, बॅँक आफ इंडीयामार्गे नवीन बसस्थानक छत्रपती चौकात धडकले. घुग्घुस नगरपरिषद झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. सर्वपक्षीय स्थापना समितीच्या नेत्यांनी स्वत: ला अटक करून घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथक बोलाविले होते. घुग्गुस पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
बॉक्स
आज मुंडन आंदोलन
घुग्घुस ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा, यासाठी सर्वपक्षीय समितीच्या वतीने घुग्घुस बंद, चक्काजाम आंदोलनानंतर मंगळवारी सकाळी १० वाजता ग्रामपंचायतच्या आवारात मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.