कोरपना नगरपंचायत सभापतीची निवड
By Admin | Updated: February 7, 2016 02:00 IST2016-02-07T02:00:37+5:302016-02-07T02:00:37+5:30
नुकताच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत विजय बावणे यांच्या नेतृत्वात लढविलेले सर्वाधिक उमेदवार निवडून आले.

कोरपना नगरपंचायत सभापतीची निवड
कोरपना : नुकताच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत विजय बावणे यांच्या नेतृत्वात लढविलेले सर्वाधिक उमेदवार निवडून आले. बहुमतांनी सत्ता प्रस्थापित केली. यानगर पंचायतीच्या अध्यक्षपदी नंदा बावणे तर उपाध्यक्षपदी मसुद अली यांची निवड झाली. यानंतर गुरुवारी सभापतिपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात मनोहर चन्ने यांची बांधकाम सभापती पदावर निवड करण्यात आली तर विजय तेलंग यांची शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून निवड झाली.
उपाध्यक्ष मसूद अली यांच्याकडे पाणी पुरवठा व जलसंधारण पद सोपवण्यात आले. रेखा भारत चन्ने या महिला व बालकल्याण विभाग सभापतीपदी निवड झाली. ही निवड प्रक्रिया शांततेत सुव्यवस्थामध्ये पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून लोंढे तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून कोरपनाच्या तहसीलदार कुमरे यांनी काम पाहिले. जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे संचाल विजय बावणे यांनी नवनियुक्तांचे स्वागत केले. स्वीकृत सदस्य म्हणून सुनिल बावणे तसेच महमद पराग अब्दुल वराब यांची निवड केली. (शहर प्रतिनिधी)