सीईओ जितेंद्र पापडकर यांनी पदभार स्वीकारला
By Admin | Updated: April 26, 2017 00:40 IST2017-04-26T00:40:05+5:302017-04-26T00:40:05+5:30
येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जितेंद्र पापडकर यांनी मंगळवारी सायंकाळी पदभार स्वीकारला.

सीईओ जितेंद्र पापडकर यांनी पदभार स्वीकारला
चंद्रपूर : येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जितेंद्र पापडकर यांनी मंगळवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. येथील मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची पदोन्नतीवर लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून शनिवारी बदली झाली. त्यांच्या जागी जितेंद्र पापडकर यांनी मंगळवारी सायंकाळी एम. देवेंद्र सिंह यांच्याकडून पदभार स्वीकारला. नवनियुक्त सीईओ जितेंद्र पापडकर हे नागपूर येथे महसूल उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तर याआधी त्यांनी यवतमाळ येथेही निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)