अंध विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती साजरी

By Admin | Updated: February 21, 2017 00:35 IST2017-02-21T00:35:36+5:302017-02-21T00:35:36+5:30

युगप्रवर्तक छत्रपति प्रतिष्ठान भद्रावतीतर्फे छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती रविवारला घोडपेठ येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरी करण्यात आली.

Celebrating Shiv Jayanti with Blind Students | अंध विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती साजरी

अंध विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती साजरी

गरजंंूना वस्तूंचे वितरण : युगप्रवर्तक छत्रपती प्रतिष्ठानचे आयोजन
घोडपेठ : युगप्रवर्तक छत्रपति प्रतिष्ठान भद्रावतीतर्फे छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती रविवारला घोडपेठ येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास निकम तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, प्रेरणा अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक गजविंद्र भोयर, संतोष देरकर, संतोष ईटनकर, वतन लोणे, युगप्रवर्तक छत्रपती प्रतिष्ठानचे अतुल कोल्हे, रोहन खुटेमाटे आदी उपस्थित होते.
रविवारी सकाळी भद्रावती येथील नागमंदिर ते नगरपरिषद जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. त्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या पालखी सोहळ्यात भद्रावतीतील युवती व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ही पालखी ढाल - तलवार, पताका व भगव्या ध्वजांनी सुशोभित तसेच पारंपारिक पद्धतिने नटलेली दिसत होती. दुपारी घोडपेठ येथील अंध विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांशी हितगूज केले. विद्यार्थ्यांना दररोज वापरात येणाऱ्या गरजेच्या वस्तू व फळवाटप केले. विद्यार्थ्यांसमवेत सामूहिक भोजनही केले. स्वयंसेवकांतर्फे विद्यालयाला छत्रपतींचा फोटो भेट देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्रतिक्षा कोल्हे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षिरसागर, भुमिका आसुटकर, प्रांजली लांबोळे, मनिषा लांबोळे, खुशी सावरकर, नम्रता लांडगे, खाडे, शेडामे, डाखरे, प्रमोद कुटेमाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.(वार्ताहर)

रिपब्लिकन सेनेच्या
वतीने शिवजयंती साजरी
चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य स्थानिक रिपब्लिकन कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. तथागत पेटकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फुले तथा आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष राजेश वनकर, धम्मप्रकाश देवगडे, संदीप सोनोने, जहीर कादरी, विकास रंगारी आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती दिली. यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Celebrating Shiv Jayanti with Blind Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.