कोरपना येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

By Admin | Updated: August 10, 2016 00:33 IST2016-08-10T00:33:26+5:302016-08-10T00:33:26+5:30

जागतीक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून कोरपना येथील आदिवासी बांधवानी मंगळवारी रॅली काढली.

Celebrate World Tribal Day at Korpana | कोरपना येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

कोरपना येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

रॅलीचे आयोजन : शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग
कोरपना : जागतीक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून कोरपना येथील आदिवासी बांधवानी मंगळवारी रॅली काढली. या रॅलीत शाळेतील विद्यार्थ्याचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
९ आॅगस्ट हा दिवस सगळीकडे आदिवासी दिवस म्हणून पाळला जातो. कोरपना तालुका हा आदिवासी तालुका म्हणून प्रचलित आहे. येथील आदिवासी बांधवानी जागतिक आदिवासी दिवस साजरा करत. कोरपना शहरातील चौका-चौकातून मिरवणूक काढली. यावेळी शहरातील संपूर्ण अदिवासी समाज व शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते.
२१ व्या शतकातसुद्घा आदिवासीच्या अनेक समस्या आहेत. जागतीक स्तरावर ९ आॅगस्ट हा दिवस आदिवासी दिवस म्हणून पाळला जातो. मात्र या दिवशी सरकारी सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे जागतिक आदिवासी दिवसानिमित्य ९ आॅगस्टला सुट्टी देण्याची तरतूद करण्यात यावी, यासाठी आदिवासी बांधवातर्फे कोरपना येथील नायब तहसिलदार देवकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आदिवासींच्या समस्या सोडविण्याचीसुद्धा मागणी करण्यात आली.
यावेळी कोरपना भाजपा अध्यक्ष नारायण हिवरकर, आदिवासी नेते अरूण मळावी, नामदेव किन्नाके, पंडरी मरस्कोले, शंकर तलांडे, सुधाकर मडावी, संजय तोडासे, मनीराम सोयाम, हेमंत कोडापे, अनिल कौरासे, नुर भाई, मारोती तोडासे, भगवान कोडापे, मुख्याध्यापक वानखडे, रणदिवे, डाखरे, विनोद वरखडे, रमेश टेकाम, कुरुमदास टेकाम, सुरेश टेकाम, गजानन कुळमीथे, विनायक मळावी, विठल गेडाम, विनोद पेंदाम, सुभाश किन्नाके, किशोर आत्राम आदी समाज बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Celebrate World Tribal Day at Korpana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.