सखी मंचतर्फे ब्रह्मपुरीत महिला दिन साजरा
By Admin | Updated: March 13, 2015 01:01 IST2015-03-13T01:01:10+5:302015-03-13T01:01:10+5:30
लोकमत सखी मंच तालुका ब्रह्मपुरीच्यावतीने जागतिक महिला दिनाच्यानिमीत्ताने रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सखी मंचतर्फे ब्रह्मपुरीत महिला दिन साजरा
ब्रह्मपुरी: लोकमत सखी मंच तालुका ब्रह्मपुरीच्यावतीने जागतिक महिला दिनाच्यानिमीत्ताने रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम स्थानिक पंचायत समिती हॉलमध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या माजी सभापती वंदना शेंडे होत्या. विशेष म्हणून लाभलेल्या शितल नगराळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अंजिरा आंबिलढुके व ऋती खरतड उपस्थित होत्या. सखीमंचच्या प्रथम संयोजिका प्रिती कऱ्हाडे व माजी संयोजिका प्रा. अमिता बन्नोरे उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. ेमाजी संयोजिका मनिषा बगमारे व विद्यमान संयोजिका अल्का खोकले यावेळी व्यासपिठावर होत्या.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मिसेस ब्रह्मपुरी या कार्यक्रमासह महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मिसेस ब्रह्मपुरी कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून प्रा. अमिता बन्नोरे, नगरसेविका अर्चना खंडाते व फॅशन डिझायनर अश्विनी नवलाखे होत्या. सर्व पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सखींचे मनोबल वाढविले. शितल नगराळे यांनी कार्यक्रमस्थळी स्त्रीभूणहत्येवर सुंदर रांगोळी चित्र रेखाटले.
मिसेस ब्रह्मपुरी हा कार्यक्रम तीन राऊंडमध्ये घेण्यात आला. पाहिला कॅटवाक राऊंड, दुसरा कॉमन प्रश्न व तिसऱ्या राऊंमध्ये एका सेंकदात प्रश्नाची उत्तर देवून यामध्ये त्यांची बुद्धीमत्ता पाहून मिसेस ब्रह्मपुरीची निवड करण्यात आली. यामध्ये कविता मोहता या मिसेस ब्रह्मपुरी ठरल्या, तर पहिली उपविजेता सोनाली गाढवे व दुसरी उपविजेता प्रणाली राखडे या ठरली. बेस्ट साडी ड्रेसींग व हेअरस्टाईलसाठी खुशाली राखडे तर बेस्ट मेकअपसाठी साची मोहता तर स्माईली फेससाठी किर्ती पातुर्डे विजेत्या ठरल्या.
यशस्वीतेसाठी संयोजिका अल्का खोकले, शिला चरपट, साधना केळझरकर, स्वाती , प्रिती कऱ्हाडे, अमिता बन्नोरे, वंदना तायडे, मनिषा बगमारे, प्रतिभा कसारे, वंदना ढोणे, अश्विनी नवलाखे, विभा चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले. सहसंयोजिका शिला चरपटे यांनी संचालन केले तर आभार वंदना तायडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)