शिवचालिसाचा ५१ वेळा पाठ करून श्रावणपर्व साजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:31 IST2021-08-19T04:31:51+5:302021-08-19T04:31:51+5:30
बल्लारपूर : स्थानिक सुभाष वॉर्ड येथील श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम येथे श्रावणपर्व प्रसंगी शिवचालिसाचा ५१ वेळा पाठ करून श्रावणपर्व ...

शिवचालिसाचा ५१ वेळा पाठ करून श्रावणपर्व साजरे
बल्लारपूर : स्थानिक सुभाष वॉर्ड येथील श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम येथे श्रावणपर्व प्रसंगी शिवचालिसाचा ५१ वेळा पाठ करून श्रावणपर्व साजरे करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रावणातील सोमवारी भाविकांनी शिवशंभू शंकराचे दर्शन केले. पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला. समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल प्राशन करणाऱ्या भगवान शंकराला या प्रसंगी भाविकांनी कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घातले.
आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाचा सात्त्विक काळ सुरू होतो. चातुर्मासातील श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवशी धार्मिक अनुष्ठान केले जाते. श्रावण सोमवारी उपवास करून शिवलिंगावर बेल अर्पण केला जातो. यावेळी शिवजप करण्यात आला.
शिवलीलामृतचे वाचनदेखील करण्यात आले. महाकाल, जटाशंकर, त्रिनेत्रधारी, भोलेनाथ आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या महादेवाची स्तुती करण्याचा हा दिवस सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बेबीताई काळे, अलका कोठारकर, पूर्णिमा कोतपल्लीवार, सीमा बोंबले, संध्या विघ्नेश्वर, माया यादव, वनिता पवार, निखिता खाडे, शीला कठाने, वर्षा सुंचूवार, गीतेताई, पवित्रादेवी यादव, धन्वंतरी आवारी, धरती बांगडे, माही पटेल, वीणा प्रजापती, कुलदीप सुंचूवार, भूषण सुंचूवार यांची उपस्थिती होती.