रक्तदान करून सावित्रीबाई फुले जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:04+5:302021-01-08T05:35:04+5:30
बल्लारपूर : स्थानिक आंबेडकर अवेकन यूथ मल्टिपर्पज सोसायटीच्यावतीने स्थानिक सिद्धार्थ विहार येथील सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरात २५ ...

रक्तदान करून सावित्रीबाई फुले जयंती साजरी
बल्लारपूर : स्थानिक आंबेडकर अवेकन यूथ मल्टिपर्पज सोसायटीच्यावतीने स्थानिक सिद्धार्थ विहार येथील सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले.
शिबिरात चंद्रपूर शासकीय रुग्णालयातील पंकज पवार, समाजसेवा अधीक्षक सुहास भिसे, वर्षा सोनटक्के, कृतिका गर्गेलवार, लक्ष्मण नगराळे, रुपेश घुमे यांनी रक्तदात्याला रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. शिबिर यशस्वीतेसाठी आंबेडकर अवेकन यूथचे पदाधिकारी मयूर लभाने, सुमेध ताकसांडे, सुमित लोहकरे, जया भसारकर, अंकिता डुंबेरे, अर्जुन वैरागडे, नितीश ताकसांडे, काजल लभाने, अल्का गुढे, करूणा लखोटे, श्रद्धा शेंडे, अंकित कवाडे, निखिल सुखदेवे, कपिल ढाले, अंकुश लखोटे, सोनल रामटेके, शिंकू ताकसांडे, प्राशय मोडक, शाहरुख शेख, धम्मपाल मून, संजय डुंबेरे, राकेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले.