कुटुंबासोबत साजरे करा नववर्षाचे स्वागत

By Admin | Updated: December 31, 2015 00:50 IST2015-12-31T00:50:45+5:302015-12-31T00:50:45+5:30

३१ डिसेंबर, सरत्या वर्षाला सलाम करून नविन वर्षाचे हर्षोल्हासात स्वागत करण्याचा हा दिवस आहे.

Celebrate with New Year New Year's Eve | कुटुंबासोबत साजरे करा नववर्षाचे स्वागत

कुटुंबासोबत साजरे करा नववर्षाचे स्वागत

वतन लोणे घोडपेठ
३१ डिसेंबर, सरत्या वर्षाला सलाम करून नविन वर्षाचे हर्षोल्हासात स्वागत करण्याचा हा दिवस आहे. नवीन वर्षाच्या आगमनासोबतच परिवार एकता दिन म्हणूनही हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यामुळेच नवीन वर्षाचे आपल्या परिवारा समवेत स्वागत केल्यास हा दिवस अधिक आनंदात साजरा करता येईल.
१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी झाली आहे. या पार्श्वभुमीवर मद्याशिवाय नवीन वर्षाचे स्वागत करणे हे मद्यशौकिनांसाठी आव्हानच ठरणार आहे. मात्र, नवीन वर्षाचे स्वागत संपूर्ण कुटूंबासमवेत केल्यास हे आव्हानही पेलता येईल.
भारतीय संस्कृतीमध्ये कुटूंबाला अनन्य साधारण महत्त्व आहे. घरातील अनुभवी व ज्येष्ठ व्यक्तींकडे कुटूंबाची सूत्रे असतात. एकत्र कुटूंबात राहत असल्यामुळे महत्त्वाच्या व अडचणीच्याप्रसंगी कुटूंबातील व्यक्तींची सोबत मिळते. त्यामुळे कोणत्याही संकटावर मात करता येते.
मात्र, काळ बदलला तशी कुटूंबाची व्याख्याही संकुचीत होत चाललेली आहे. आम्ही दोघे व आमचे दोघे या मर्यादेत सध्याची कुटूंबे अडकत चाललेली आहेत. जीवन जगणे सोपे व्हावे म्हणून तंत्रज्ञान आले. तंत्रज्ञानाच्या येण्याने काळ बदलला. मात्र माणसे दुरावत चालली आहेत. या दुरावणाऱ्या कुटूंबांना एकत्र जोडण्याचे काम चंद्रपुरातील परिवार बचाव संघटना करीत आहे. भारतीय परिवार बचाव संघटना ही नावाप्रमाणेच भारतीय परिवारांना जोडण्याचे काम करते.
बहुतांश प्रकरणांमध्ये हुंडा या कारणामुळे पती-पत्नी व कुटूंबातील मतभेद वाढत जावून प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. संसाराची विस्कटलेली घडी व्यवस्थीत बसविण्याचे काम भारतीय परिवार बचाव संघटनेतर्फे सुरू आहे.

Web Title: Celebrate with New Year New Year's Eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.