दृष्टिहीनांसोबत ‘इनरव्हील डे’ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:47+5:302021-02-05T07:43:47+5:30
चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने येथील दृष्टिहीन जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेमध्ये इनरव्हील डे साजरा करण्यात आला. यावेळी ...

दृष्टिहीनांसोबत ‘इनरव्हील डे’ साजरा
चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने येथील दृष्टिहीन जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेमध्ये इनरव्हील डे साजरा करण्यात आला. यावेळी येथील दृष्टिहीनांसाठी चालण्यासाठी उपयोगी अशा दिव्यांग काठ्या क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी यांच्या हस्ते संस्थेचे सचिव सतीश शेंडे यांना भेट देण्यात आल्या. यासोबतच विविध उपक्रमही राबविण्यात आले. चंद्रपूर येथील तीनवर्षीय नियारा जैन हिची विश्व रेकॉर्डमध्ये नोंद झाली. तसेच क्लबच्या सदस्य सोनम कपूर यांना ‘ए.पी.जे. अब्दुल कलाम’ हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व सदस्यांनी केक कापून ‘इनरव्हील डे’ साजरा केला. यावेळी क्लबच्या पी.डी.सी. विद्या बांगडे, अध्यक्ष कल्पना गुप्ता, सचिव शकुंतला गोयल, कोषाध्यक्ष सुनीता जयस्वाल, आयएसओ तनुजा पटेल, सीसी उमा जैन, शहीन शफिक यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.