घरावर झेंडा लावून भाजपाचा वर्धापन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST2021-04-07T04:29:24+5:302021-04-07T04:29:24+5:30

चंद्रपूर : भारतीय जनता पक्ष (ग्रामीण) चंद्रपूरच्या वतीने माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ...

Celebrate BJP's anniversary by putting a flag on the house | घरावर झेंडा लावून भाजपाचा वर्धापन दिन साजरा

घरावर झेंडा लावून भाजपाचा वर्धापन दिन साजरा

चंद्रपूर : भारतीय जनता पक्ष (ग्रामीण) चंद्रपूरच्या वतीने माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर तालुका ग्रामीण येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या घरावर भारतीय जनता पक्षाचा ध्वज फडकावून भारतीय जनता पक्षाचा ४१वा वर्धापन दिन साजरा केला. हा उपक्रम साखरवाई, विचोडा, छोटा नागपूर, पडोली, दाताळा, चिचाडा, वांढरी, खुटाळा, यशवंतनगर, नकोडा, मार्डा, जिल्हा परिषद क्षेत्रातील इतर गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वत:च्या घरावर पक्षाचा झेंडा लावून वर्धापन दिन साजरा केला. भा. ज. यु. मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी आभार मानले.

Web Title: Celebrate BJP's anniversary by putting a flag on the house