शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

सीडीसीसी बँकेची ऑनलाइन प्रणाली हॅॅक; साडेतीन कोटी उडविले

By परिमल डोहणे | Updated: February 12, 2025 23:08 IST

दिल्ली व नोएडाच्या बँक खात्यात केले वळते...

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनएएफटी व आरटीजीएस करण्याची ऑनलाइन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बँक व्यवस्थापकांनी याबाबतची तक्रार रामनगर व सायबर पोलिस ठाण्यात केली आहे. जिल्ह्यात असा प्रकार पहिलाच असल्याचे बोलले जात आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विस्तार जिल्हाभरात झाला आहे. येथील खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही बँक एका शासकीय बँकेशी लिंकअप आहे. त्याद्वारे ऑनलाइन व्यवहार केले जातात. या बँकेतून दररोज आरटीजीएस व एनएएफटी केली जाते. दरम्यान, ७ फेब्रुवारी व १० फेब्रुवारीला अज्ञाताने आरटीजीएस व एनएएफटीची करण्याची ऑनलाइन प्रक्रियाच हॅक करून तेथून सर्व रक्कम दिल्ली व नोएडा येथील बँक खात्यावर वळती केली. ही बाब समोर येताच बँक व्यवस्थापनात खळबळ उडाली. दरम्यान, व्यवस्थापकांनी रामनगर पोलिस स्टेशन गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.३३ ट्रान्झेक्शन फ्रीझरामनगर व सायबर पोलिस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल होताच चंद्रपूर सायबर पोलिसांनी ३३ ट्रॉन्झेक्शन फ्रीझ करून ६० लाख ६४ हजार ५८२ रुपये परत जमा केले, तर ७१ लाख ३४ हजार ७३७ रुपये विविध बँक खात्याच्या अकाउंटला होल्ड झाले आहेत. सायबर पोलिसांच्या तत्काळ ॲक्शनने एक कोटी ३१ लाख ९९ हजार ३१९ रुपये वाचविण्यास यश आले आहे.बँकेने गठित केले दहा चमूसायबर चोरट्यांकडून पुन्हा असा प्रकार घडू नये, या अनुषंगाने बँक व्यवस्थापकांनी दहा वेगवेगळ्या चमूंचे गठन केले आहे. हे सर्व चमू नजर ठेवून आहेत. कोणत्याही खातेदाराच्या खात्यातून पैसे गेले नाही. त्यामुळे खातेदारांनी घाबरू नये, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी केले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसbankबँकCrime Newsगुन्हेगारी