सीडीसीसी बॅंकेतर्फे राजुरा येथे महिला बचत गट मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST2021-07-02T04:20:08+5:302021-07-02T04:20:08+5:30
चंद्रपूर : नाबार्ड पुरस्कृत वित्तीय व डिजिटल साक्षरता शिबिराअंतर्गत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या राजुरा शाखेतर्फे राजुरा येथे महिला बचत ...

सीडीसीसी बॅंकेतर्फे राजुरा येथे महिला बचत गट मेळावा
चंद्रपूर : नाबार्ड पुरस्कृत वित्तीय व डिजिटल साक्षरता शिबिराअंतर्गत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या राजुरा शाखेतर्फे राजुरा येथे महिला बचत गट मेळावा व कर्जवितरण कार्यक्रम पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बॅंकेचे संचालक तथा विभागीय कर्ज समिती राजुराचे अध्यक्ष विजय बावणे, उद्घाटक बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक शेखर धोटे यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बॅंकेचे संचालक प्रा. ललित मोटघरे, संचालिका नंदा अल्लुरवार, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक तृणाल फुलझेले आदी उपस्थित होते.
यावेळी संचालक विजय बावणे यांनी महिलांनी शेती व्यवसायासोबतच बचतगटाच्या माध्यमातून व्यवसाय उभारून प्रगती साधण्याचे आवाहन केले, तर शेखर धोटे यांनी कुटुंब, समाज, राष्ट्र आणि अर्थव्यवस्था याचा विकास घडविण्यात महिलांचा मोठा वाटा व सहभाग असल्याचे सांगितले. संचालक ललित मोटघरे यांनी बचत गटाचा इतिहास सांगून त्याचे महत्त्व विषद केले. नंदाताई अल्लूरवार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक तृणाल फुलझेले यांनी डिजिटल बॅंकिंगबाबत मार्गदर्शन केेले.
मेळाव्यात ६ बचत गटांना ११.८० लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.