ताडोबातील बंदिस्त गजराजवर सीसीटीव्हीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:30+5:30

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चवताळलेल्या गजराजने १६ नोव्हेंबरला माहुत जानिक मसराम (४७) याला सोेंडेने आपटून त्यानंतर पायाने डोके ठेचून ठार केले होते. या घटनेमुळे संपूर्ण ताडोबा प्रशासन हादरले. चवताळलेला गजराजने आपला मोर्चा मोहर्लीकडे नेल्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्याला ट्रॅन्क्यूलाईझ करणे किंवा शुट करणे हे दोनच पर्याय ताडोबा प्रशासनाकडे होते.

CCTV Watch on Bandit Gajraj in Tadoba | ताडोबातील बंदिस्त गजराजवर सीसीटीव्हीचा वॉच

ताडोबातील बंदिस्त गजराजवर सीसीटीव्हीचा वॉच

ठळक मुद्दे२४ तास डॉक्टरांची नजर : धोका टाळण्यासाठी सौर ऊर्जेचे कुंपण

साईनाथ कुचनकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एक महिन्यापूर्वी चवताळलेल्या हत्तीला बेशुद्ध केल्यानंतर त्याला साखळदंड घालून जेरबंद करण्यात आले होते. मागील महिनाभरापासून त्याच्या प्रत्येक हालचालीवर पशुवैद्यकीय अधिकारी २४ तास नजर ठेवून आहे. दरम्यान, धोका टाळण्यासाठी त्याला सौर उर्जेच्या कुंपणामध्ये ठेवण्यात आले आहे. अद्यापही त्याच्या हार्मोन्सची पातळी कमी झाली नसल्याने त्याची दहशत कायम आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चवताळलेल्या गजराजने १६ नोव्हेंबरला माहुत जानिक मसराम (४७) याला सोेंडेने आपटून त्यानंतर पायाने डोके ठेचून ठार केले होते. या घटनेमुळे संपूर्ण ताडोबा प्रशासन हादरले. चवताळलेला गजराजने आपला मोर्चा मोहर्लीकडे नेल्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्याला ट्रॅन्क्यूलाईझ करणे किंवा शुट करणे हे दोनच पर्याय ताडोबा प्रशासनाकडे होते. मात्र ताडोबा बफर क्षेत्राचे उपवनसंरक्षक गुरुप्रदास यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्यासोबत चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत गजराजला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर खोब्रागडे यांनी शर्थिचे प्रयत्न करून त्याला यशस्वीरित्या बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. यामुळे मोठी दुर्घटना टळली असून मागील एक महिन्यापासून त्याला साखळदंडामध्ये डॉक्टरांच्या देखरेखाली ठेवण्यात आले आहे. असे असले तरी अद्यापही त्याचे हार्मोन्स कमी झालेले नाही.

दररोज १५० किलो गवत आणि पाण्याचा मारा
चवताळलेल्या गजराजला साखळदंडामध्ये बंद करून ठेवल्यानंतर त्याला दररोज १५० किलो गवत तसेच औषधोपचार केला जात आहे. एवढेच नाही, तर त्याच्यावर सतत पाण्याचा मारा करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

२५ वर्षांपूर्वी घडली होती अशीच घटना
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये २५ वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती. त्यावेळी हत्तीला हाताळण्यासाठी असलेल्या अपुऱ्या सुविधा तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव असल्यामुळे चवताळलेल्या हत्तीला ठार करण्यात आले होते. मात्र यावेळी परिस्थितीमध्ये थोड्याफार बदल झाला असून अनुभवी पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या प्रयत्नामुळे यावेळी गणराजचा प्राण वाचला.

या हत्तीला कंट्रोल करणे अशक्यप्राय होते. मात्र मोठ्या प्रयत्नानंतर त्याला बेशुद्ध करण्यात यश आले. त्याच्या प्रत्येक हालचालीवर पूर्णवेळ लक्ष ठेवण्यात येत असून औषधोपचार सुरु आहे.
- डॉ. रविकांत खोब्रागडे
पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर

हत्तीला साखळदंडामध्ये ठेवण्यात आले असून त्याची पूर्णवेळ देखरेख करणे सुरु आहे. धोका टाळण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही तसेच संपूर्ण परिसरामध्ये सौरउर्जेचे कुंपन करण्यात आले आहे.
- एन. आर. प्रवीण, क्षेत्र संचालक ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प

Web Title: CCTV Watch on Bandit Gajraj in Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.