कत्तलखान्यातून गाय व दोन वासरांची सुटका
By Admin | Updated: November 14, 2015 01:13 IST2015-11-14T01:13:13+5:302015-11-14T01:13:13+5:30
पंचशील वार्डात असलेल्या एका कत्तलखान्यातून रामनगर पोलिसांनी गायगोधनाच्या दिवशी गुरूवारी एक गाय व तिच्या दोन वासरांची सुटका केली.

कत्तलखान्यातून गाय व दोन वासरांची सुटका
गाय गोधनाच्यादिवशी घडली घटना : रामनगर पोलिसांनी केली कारवाई
चंद्रपूर : पंचशील वार्डात असलेल्या एका कत्तलखान्यातून रामनगर पोलिसांनी गायगोधनाच्या दिवशी गुरूवारी एक गाय व तिच्या दोन वासरांची सुटका केली.
गाय दोन दिवसांपासून दिसत नसल्याने मालकाने गुरूवारी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. गुरूवारी १२ नोव्हेंबरला गाय गोधनचा दिवस होता. आपली गाय बेपत्ता असल्याने गाईचा शोध घेताघेता गाय मालक पंचशील चौकात पोहचला. त्याने आपल्या गाईला आवाज दिला. मालकाचा आवाज ऐकताच गाईने जोराने हंबरडा फोडल्याने त्याला गाय याच परिसरात असल्याचे कळले. त्याने ताबडतोब रामनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस पंचशील चौक हिंदुस्तान स्क्रॅब मर्चंटचे बाजूला पोहचले. तेव्हा गाय त्याच परिसरातील एका घरात असलेल्या कत्तलखान्यात आढळून आली. तिची दोन वासरेसुद्धा त्या ठिकाणी बांधून होती. गाईचे चारही पाय बांधून होते.पोलिसांनी आणि गाय मालकाने गायीला व वासरांना बाहेर काढले. आपल्या गायीला पाहून त्याचे डोळ्यात पाणी आले. गाय गोधनच्या दिवशी कसाब त्याच्या गाईची कत्तल करणार होते यात शंका नव्हती. परंतु त्याने गाईचा शोध सुरूच ठेवल्याने गाय मिळाली. पोलिसांना या प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे. शहरातील दुग्ध व्यवसायींच्या घरासमोरून शहरातील काही कसाब गाईंची चोरी करून कत्तल करीत असल्याचा प्रकार वर्षापासून सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गोधनाची चोरी होत आहे. परंतु योग्य तपासाअभावी कत्तल होत आहे. (प्रतिनिधी)