वाहकांनो जरा जपून!
By Admin | Updated: February 3, 2015 22:52 IST2015-02-03T22:52:30+5:302015-02-03T22:52:30+5:30
बिना टिकीत प्रवाशांना एसटीत बसवून त्यांच्याकडून मिळणारे पेसे खिशात टाकणे, पार्सलची ने-आण करता येत नसली तरी कोणतीही परवानगी न घेणे, प्रवाशांना सुटे पैसे वापस

वाहकांनो जरा जपून!
एका महिन्यात १४ एसटी वाहक निलंबित : मार्ग तपासणी पथकाने केली कारवाई
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
बिना टिकीत प्रवाशांना एसटीत बसवून त्यांच्याकडून मिळणारे पेसे खिशात टाकणे, पार्सलची ने-आण करता येत नसली तरी कोणतीही परवानगी न घेणे, प्रवाशांना सुटे पैसे वापस करताना कुचराई करणे एसटी वाहकांना चांगलेच महागात पडले आहे. मागील एका महिन्यामध्ये चंद्रपूर विभागातील तब्बल १४ वाहकांना याच कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ११ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने सध्या महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबड उडाली आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे बिद्र असलेल्या एसटीचे खासगी वाहनांच्या तुलनेत भाडे जास्त असले तरी प्रवाशी आजही एसटीलाच प्राधान्य देतात. ग्रामीण भागाला शहराशी जोडण्याचे महत्त्वाचे काम एसटीने केले आहे. मात्र सध्या या ना त्या कारणामुळे एसटी चर्चेचा विषय बनत आहे. प्रवाशांना सुविधा उपलब्ध व्हावी, त्यांना कोणत्याही प्रकारे एसटीतून प्रवास करताना त्रास होऊ नये यासाठी महामंडळ प्रयत्नशील असले तरी काही कर्मचारी प्रवाशांना अशरश: वेठीस धरताना दिसते.
त्यामुळे अनेकवेळा वाहन आणि प्रवाशांमध्ये खटकेही उडतात. हे प्रकार टाळण्यासाठी मार्ग तपासणी पथकाची निर्मिती करण्यात आली. याच तपासणीदरम्यान जानेवारी महिन्यामध्ये १४ वाहक विविध कारणांसाठी अपहार करताना आढळले आहे. त्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. तर ११ वाहकांना कारणे नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.