शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! २० फूट उसळून घरावर आदळली कार; विचित्र अपघातात एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 12:36 IST

पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी कार ठाण्यात जमा केली

नागभीड (चंद्रपूर) : ब्रह्मपुरी-नागभीड राष्ट्रीय महामार्गावरील भिकेश्वर फाट्यावर गुरुवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. महिलाचालक असलेल्या एका कारने दुचाकीला ठोस मारून २० फूट उसळी घेत घराला जोरदार धडक दिली. कारमधील कुणालाही इजा झाली नाही. मात्र दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ढेबू दयाराम कुत्तरमारे (४२) असे जखमीचे नाव आहे.

नागपूर येथील तीन महिला एम.एच. ३१ बीके ५३११ क्रमांकाच्या कारने ब्रह्मपुरीला जात होत्या. भरधाव कारने दुचाकीस्वार ढेबू कुत्तरमारे याला भिकेश्वर फाट्यावर धडक दिली. या अपघाताने महिला कारचालक चांगलीच गोंधळली आणि या गोंधळात कारवरील नियंत्रण सुटले. ही कार २० फूट अंतरावर असलेल्या एका घराच्या सज्जाला आदळून खाली पडली. अंगणात कुणी असते तर मोठा अनर्थ घडला असता. दुचाकीस्वार ढेबू कुत्तरमारे याला ब्रह्मपुरी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. नागभीड पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी कार ठाण्यात जमा केली.

टॅग्स :Accidentअपघातchandrapur-acचंद्रपूर