वैचारिक समृद्धीसाठी मकरसंक्रांत उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:12 IST2021-01-24T04:12:14+5:302021-01-24T04:12:14+5:30

चंद्रपूर : मकरसंक्रांत उत्सवाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होत असते. त्यामुळे मकरसंक्रांती वैचारिक समृद्धीसाठी उपयुक्त उत्सव असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ...

Capricorn is useful for ideological prosperity | वैचारिक समृद्धीसाठी मकरसंक्रांत उपयुक्त

वैचारिक समृद्धीसाठी मकरसंक्रांत उपयुक्त

चंद्रपूर : मकरसंक्रांत उत्सवाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होत असते. त्यामुळे मकरसंक्रांती वैचारिक समृद्धीसाठी उपयुक्त उत्सव असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र पाटील यांनी केले.

चंद्रपूर बचाव संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागाच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांत उत्साव महामंडळाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रज्ञा पाटील, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्ष डॉ.गोपाल मुंधडा, अश्विनी खोब्रागडे, विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे, कामगार अधिकारी बेलवे आदी उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी उखाणे स्पर्धा व मकरसंक्रांती स्पर्धा घेण्यात आली मकरसंक्रांती स्पर्धेत प्रथम स्नेहल ढोरे, उखाणे स्पर्धेत प्रथम राखी मत्ते, द्वितीय रश्मी सप्रे, तृतीय विद्या गार्गेलवार यांनी पटकावला. विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक म्हणून चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या संजिवनी कुबेर, वनश्री मेश्राम, भावना टेकाम यांनी जबाबदारी सांभाळली.

Web Title: Capricorn is useful for ideological prosperity