गांजा तस्करी, महिलेसह युवकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:49+5:302021-06-29T04:19:49+5:30

साजीद शेख रफीक शेख (३१) रा. शंकरपावली, गिरड जि. वर्धा व रुकसाना शेख युसूफ शेख (२१) रा. मीना टाऊन ...

Cannabis smuggling, youth arrested along with woman | गांजा तस्करी, महिलेसह युवकास अटक

गांजा तस्करी, महिलेसह युवकास अटक

साजीद शेख रफीक शेख (३१) रा. शंकरपावली, गिरड जि. वर्धा व रुकसाना शेख युसूफ शेख (२१) रा. मीना टाऊन नागपूर, अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे मोटरसायकलने (क्रमांक एमएच ३१ एयू ७७६३) वरोऱ्यावरून चंद्रपूरकडे गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्याआधारे टप्पा परिसरात नाकाबंदी केली असता यातील दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळ सव्वादोन किलो गांजा जप्त केला. याची किंमत २२ हजार ५५० रुपये व वाहन असा एकूण ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभागप्रमुख अमोल तुळजेवार, सचिन गुरनुले, रोहित चिटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.

===Photopath===

280621\img-20210628-wa0062.jpg

===Caption===

गांजा तस्करी करणाऱ्या महिले सह युवकास अटक

Web Title: Cannabis smuggling, youth arrested along with woman