शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Candrapur: एक कोटीने फसवणूक करणारा जाळ्यात, सावली पोलिसांची कारवाई

By परिमल डोहणे | Updated: May 29, 2023 23:33 IST

Crime News: बनावट कागदपत्रे तयार करून मूल येथील श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेतून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार मागील अडीच वर्षांपूर्वी उघडकीस आला होता.

- परिमल डोहणे

चंद्रपूर : बनावट कागदपत्रे तयार करून मूल येथील श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेतून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार मागील अडीच वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी मागील अडीच वर्षांपूर्वीपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात सावली पोलिसांना यश आले आहे. राजेश वसंतराव राईंचवार (५५) रा. सावली असे मागील अडीच वर्षांपासून फरार असलेल्या अटकेतील आरोपीचे नाव आहे. यातील दोन आरोपींना यापूर्वीच न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेच्या बॅंक व्यवस्थापकांनी कर्जदार सरिता राजेश राईंचवार, जमानतदार राजेश वसंत राईंचवार, मूल्यांकनकर्ता सचिन चिंतावार यांनी संगनमत करून खोटे व बनावट दस्तऐवज तयार करुन बॅंकेची एक कोटीने फसवणूक केल्याची तक्रार सावली पोलिसात केली होती. या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला. न्यायालयांनी कर्जदार सरिता राजेश राईंचवार व मूल्याकनकर्ता यांना जामीन मंजूर केला होता. परंतु, अडीच वर्षांपासून मुख्य आरोपी असलेले राजेश राईंचवार फरार होते.

दरम्यान, २४ मे रोजी राजेश राईंचवार हे एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात असल्याची माहिती सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी लगेच सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अशी केली फसवणूक१० मार्च २०१६ रोजी राजेश राईंचवार याने आपल्या पत्नीच्या नावाने  श्री कन्यका नागरी बॅंकेत व्यवसायासाठी ७५ लाख रुपये कर्जासाठी अर्ज केला होता. १७ मार्च रोजी त्यांनी अर्जासह सातबारा, मूल्यांकन अहवाल, कर्जदार व जमानतदार यांच्या सह्यांचे नमुना कार्ड इतर आवश्यक दस्तावेज दिले. दरम्यान, ७ डिसेंबर २०१६ रोजी पुन्हा बॅंकेत कर्जमर्यादा ५० लाखाने वाढवून देण्याची मागणी केली. तेव्हा बॅंकेने २५ लाख रुपये वाढीव कर्ज मंजूर करुन एकूण एक कोटींचे कर्ज दिले. काही दिवस त्यांनी कर्जाचा भरणा नियमित केला. त्यानंतर ते कर्ज थकीत होते. बॅंकेने त्यांना नोटीस दिली होती. तरीही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे बॅंकेने कर्जाचा भरणा न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जप्तीची कार्यवाही केली. यावेळी तारण संपत्तीचा पंचनामा केला असता, तारण संपत्ती प्रत्यक्षात दिसून आली नाही. याबाबत कर्जदार व मूल्यांकक यांना विचारणा केली असता, उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी