मतदार यादीच्या अभ्यासात गुंतले उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST2020-12-30T04:38:51+5:302020-12-30T04:38:51+5:30
सिंदेवाही : तालुक्यातील परिसरात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. परंतु, यावेळी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने निवडणुकीत ...

मतदार यादीच्या अभ्यासात गुंतले उमेदवार
सिंदेवाही : तालुक्यातील परिसरात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. परंतु, यावेळी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने निवडणुकीत विजयी कसे होता येईल, यासाठी इच्छूक उमेदवार मतदार यादीच्या अभ्यासात गुंतल्याचे दिसत आहे.
राजकीय पक्षाच्या उमेदवारांची आरक्षण नुसार पॅनल निवड करणे सुरू आहे. उमेदवारांना अर्ज भरण्याकरीता दोन दिवसाचा कालावधी आहे. ऑनलाईन प्रक्रिया कागदपत्रांचे नियोजन करून भरणे सुरू केली. प्रत्येक वार्डात पॅनेलचे उमेदवार मिळेल या उद्देशाने राखीव जागांच्या उमेदवारीचा शोध घेतल्यानंतर राखीव जागेकरिता नामांकन भरणे सुरू झाले आहे. सरपंच आरक्षण नसल्याने राखीव असलेल्या उमेदवारांना अडचण निर्माण झाली आहे . वार्डातील विकासापासून वंचित असलेले उमेदवार, योग्य निवडीचे जोडीदार, महिला उमेदवार शोधताना दिसत आहे. मतदार यादीचा घोळ लक्षात घेता एका वार्डातील यादीतील नावे दुसऱ्या वार्डाचे यादीत असल्यामुळे उमेदवार मतदार यादीचा अभ्यासात गुंतलेले आहे. शहरातील मतदार यादीमध्ये नावांचा घोळ, मृत व्यक्तींचा शोध, भाडेकरूंचे मतदान गाव सोडून गेलेले वैवाहिक जोडी, पुरवणी यादीत नवीन मतदार, वार्डातील मतदारांचे यादीत नावात बदल झाल्याने उमेदवार संभ्रमात आहेत. मतदानाकरीता पॅनल लढविणारे विकासाच्या मुद्द्यावर वार्डातील नवीन उमेदवारांना पसंती देत आहे. मतदार यादीचा पूर्णपणे वार्डातील उमेदवार पॅनलचे, अपक्ष, पक्षाचे नेतृत्व करताना अभ्यासात गुंतल्याचे चित्र दिसत आहे.