लोनवाहीत ४४ जागांसाठी उमेदवाराच्या प्रचाराचा धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:10+5:302021-01-09T04:23:10+5:30

४ जानेवारीला प्रचार चिन्हाचे वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यात व्यक्तिगत गाठीभेटीवर उमेदवारांनी भर दिला आहे. लोनवाही गावातील अनेक ...

Candidate's campaign dust for 44 seats in Loanwahi | लोनवाहीत ४४ जागांसाठी उमेदवाराच्या प्रचाराचा धुरळा

लोनवाहीत ४४ जागांसाठी उमेदवाराच्या प्रचाराचा धुरळा

४ जानेवारीला प्रचार चिन्हाचे वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यात व्यक्तिगत गाठीभेटीवर उमेदवारांनी भर दिला आहे. लोनवाही गावातील अनेक कुटुंबे रोजगाराच्या शोधात गावाबाहेर व नागपूर चंद्रपूर शहरात राहतात. आता मतांची जुळवणी करण्यासाठी राजकारण्यांना त्यांची आठवण होऊ लागली आहे. बाहेरील मतदार कोणाच्या जवळचा आहे, आपल्याला मते मिळणार काय, याचा हिशोब लावून त्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येते.

मतांच्या गोळाबेरजेवर भर

निवडणुकीत अतिशय चुरशीची व काट्याची झुंज असते. प्रत्येक उमेदवार आपापल्या मतांवर बारीक नजर ठेवून आहेत. वाॅर्डातील कौटुंबिक प्राबल्य, मतांची संख्या, स्वतःला मिळणाऱ्या मतांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहेत.

बॉक्स

कोरोना संकटाचा विसर

सध्या कोरोना संकट काळ सुरू असला तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत कोरोनाची भीती नाहीशी झाल्याची स्थिती दिसते. कुणाच्याही तोंडावर मास्क दिसून येत नाही, सोशल डिस्टन्स तर नावालाही शिल्लक नाही.

Web Title: Candidate's campaign dust for 44 seats in Loanwahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.