सेल्फीचा अध्यादेश रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 01:31 IST2016-11-07T01:31:32+5:302016-11-07T01:31:32+5:30
स्थलांतरित होणाऱ्या व अनियमित विद्यार्थ्यांची सेल्फीद्वारे माहिती देण्याचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षक संघाने केली आहे.

सेल्फीचा अध्यादेश रद्द करा
मागणी : महाराष्ट्र शिक्षक संघाचे निवेदन
चंद्रपूर : स्थलांतरित होणाऱ्या व अनियमित विद्यार्थ्यांची सेल्फीद्वारे माहिती देण्याचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षक संघाने केली आहे.
स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर २०१६ ला अध्यादेश जारी केला आहे. १ जानेवारी २०१७ पासून दर सोमवारी शाळेच्या पटावर असलेल्या सर्व मुलांच्या १० व्या गटात वर्ग शिक्षकासोबत सेल्फी काढायचा, सेल्फीमधल्या सर्व मुलांची नावे आधारकार्ड नंबरसह सरलमध्ये भरायची असल्याने या अध्यादेशाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होणार असल्याने सदर अध्यादेश रद्द करण्याची मागणी शिक्षक संघाचे राज्यनेते माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात राज्याध्यक्ष राजाराम वरूटे, सचिव केशवराव जाधव, सल्लागार वसंत हारगुंडे, बाळासाहेब काळे, मधुकर काठोळे, तुकाराम कदम आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)