प्राध्यापकाने लावला मुलींच्या स्वच्छतागृहात कॅमेरा

By Admin | Updated: September 3, 2016 00:33 IST2016-09-03T00:33:58+5:302016-09-03T00:33:58+5:30

शहरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था मागील कित्येक वर्षापासून कार्यरत असून...

The camera in the lecturer's assessed bathroom | प्राध्यापकाने लावला मुलींच्या स्वच्छतागृहात कॅमेरा

प्राध्यापकाने लावला मुलींच्या स्वच्छतागृहात कॅमेरा

खळबळ : नामांकित संस्थेतील प्रकार
वरोरा : शहरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था मागील कित्येक वर्षापासून कार्यरत असून शिक्षक व प्राध्यापक अथक मेहनत घेत असल्याने वरोरा शहर पंचक्रोशीत शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या येथील शैक्षणिक क्षेत्रात काळीमा फासणाऱ्या अनेक घटना उघडकीस येत आहे. एका प्राध्यापकाने मुलींच्या स्वच्छतागृहात पेन कॅमेरा लावल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मात्र हा पेन कॅमेरा लावताना प्राध्यापकाचाही फोटो आल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे. संस्थेने प्राध्यापकाचा राजीनामा घेत प्रकरणावर पडदा टाकला आहे.
सदर पेन कॅमेरा सदर प्राध्यापकाने मागील कित्येक दिवसांपूर्वीच लावल्याचेही उघडकीस आले आहे. त्याचे कनेक्शन त्या प्राध्यापकाच्या मोबाईलमध्ये असल्याचे मानले जात आहे. मात्र हा पेन कॅमेरा मुलीच्या हाती लागल्याने तो प्राचार्याकडे सुपूर्द करण्यात आला.
प्राचार्यानी पेन कॅमेरातील चीप बघितली असता त्या युवा प्राध्यापकाचा फोटो दिसल्याने प्राचार्यांनी सदर कॅमेरा तात्काळ संस्थेकडे दिला. संस्थेने प्राध्यापकास तात्काळ राजीनामा देण्यास सांगून प्रकरणावर पडदा टाकला. परंतु एवढा संतापजनक प्रकार घडल्यानंतरही पोलीस कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The camera in the lecturer's assessed bathroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.