केबल लाईनच्या खोदकामाने रस्त्याची लावली वाट

By Admin | Updated: August 14, 2015 01:17 IST2015-08-14T01:17:37+5:302015-08-14T01:17:37+5:30

विद्यार्थ्यांना अडचणीशंकरपूर : शंकरपूर-साठगाव रस्त्याच्या लगतच बीएसएनएल कंपनीने ग्रामपंचायतीला फायबर केबल पुरवठ्यासाठी खोदकाम केले आहे.

The cable waving the cable line | केबल लाईनच्या खोदकामाने रस्त्याची लावली वाट

केबल लाईनच्या खोदकामाने रस्त्याची लावली वाट


बससेवा बंद : विद्यार्थ्यांना अडचणीशंकरपूर : शंकरपूर-साठगाव रस्त्याच्या लगतच बीएसएनएल कंपनीने ग्रामपंचायतीला फायबर केबल पुरवठ्यासाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरले असून रस्ताही अरूंद झाला आहे. त्यामुळे बस व इतर चारचाकी वाहन जाणे बंद झाल्याने येथील गावकऱ्यांचा शंकरपूरशी संपर्क तुटला आहे. परिणामी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.
भारत दुरसंचार निगम लिमिटेडचे प्रत्येक ग्रामपंचायतीला इंटरनेटशी जोडण्यासाठी फायबर केबल लावणे सुरू आहे. यासाठी कंपनीने अगदी रस्त्यालगतच खोदकाम केले आहे. आधीच शंकरपूर-साठगाव रस्ता अतिशय अरूंद आहे. या रस्त्याच्या बाजूनेच खोदकाम केले असल्याने महामंडळाची बस जाऊ शकत नाही.
या मार्गानेच जवराबोडी, साठगाव, हिवरा, कोलारी या गावातील विद्यार्थी शंकरपूर येथे शिक्षणासाठी बसने ये-जा करतात. परंतु, बस बंद असल्याने या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एस.टी. बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आठ ते दहा किलोमीटर पायी जावे लागत आहे. सोबतच मुख्य बाजारपेठ शंकरपूर असल्याने येथेही जाण्यास त्रास सहन करावा लागत आहे. बीएसएनएल कंपनीने माती रस्त्यावरच टाकली असल्यानेग मातीमुळे चिखल पसरला आहे. (वार्ताहर)

Web Title: The cable waving the cable line