केबल आॅपरेटरला २१ लाखांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 00:49 IST2016-09-02T00:49:47+5:302016-09-02T00:49:47+5:30

जिल्हा वितरण बनविण्याचे सांगत एका केबल आॅपरेटरची २१ लाख रुपयांनी फसवणूक केली

The cable operator lost 21 lakhs | केबल आॅपरेटरला २१ लाखांनी गंडविले

केबल आॅपरेटरला २१ लाखांनी गंडविले

दोघांना अटक : शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
चंद्रपूर : जिल्हा वितरण बनविण्याचे सांगत एका केबल आॅपरेटरची २१ लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून आज गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वप्नील पेठे व रितेश श्रीवास्तव अशी आरोपींची नावे आहेत. काही महिन्यांपूर्वी केबल आॅपरेटरांची एक सभा पार पडली होती. या सभेत घुटकाळा येथील रहिवासी प्रशांत ताकसांडे याची भेट जगन्नाथबाबा नगरातील स्वप्नील पेठे व नागपूर येथील रितेश श्रीवास्तव यांच्याशी झाली. आरोपींनी प्रशांतला विश्वासात घेऊन जिल्हा वितरक बनविण्याचे आमिष देत दोनवेळा नऊ-नऊ लाख रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा तीन लाख रुपये आरोपींनी प्रशांतकडून घेतले. मात्र पैैसे देऊनही काम न झाल्याने प्रशांत आपले पैसे परत मागितले. मात्र आरोपींनी पैसे देण्यान नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशांत ताकसांडे यांंनी स्वप्नील पेठे व रितेश श्रीवास्तव यांच्याविरुध्द शहर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुध्द कलम ४२०, ४८८, ४७५, ५२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आज गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यादरम्यान, आरोपीकडून आणखी काही माहिती मिळते का, याचा तपास करण्यात येईल, असे पोलीस उपनिरीक्षक बी.एम. वाकडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The cable operator lost 21 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.