कोबीचे पीक करपले
By Admin | Updated: May 7, 2015 00:57 IST2015-05-07T00:57:45+5:302015-05-07T00:57:45+5:30
कोबी पिकाची लागवड केली. आता पीक हाती आले असतानाच पीक करपून गेले.

कोबीचे पीक करपले
वरोरा : कोबी पिकाची लागवड केली. आता पीक हाती आले असतानाच पीक करपून गेले. त्या२मुळे वरोरा तालुक्यातील नांद्रा गावातील तीन शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
वरोरा तालुक्यातील नांद्रा गावातील काही शेतकरी कोबी पिकाची लागवड करतात. गणेश काळे यांनी एक एकरात ६० ग्रॅम कोबीचे बियाने टाकले. विनोद हरबडे यांनी अर्धा एकरात कोबीचे बियाने लावले तर गुलाब दडमल यांनीही पाऊण एकरात कोबी पिकाची लागवड केली. कोबी बियानाची लागवड केल्यानंतर कोबीचे पीक जमीनीवर आले. येत्या काही दिवसांत झाडाला कोबीचे फूल लागेल, या अपेक्षेने तिन्ही शेतकरी मशागत करु लागले. वेळोवेळी किटकनाशकाची फवारणी केली व कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. परंतु किटकनाशकाची फवारणी केल्यानंतर काही तास कोबीच्या झाडावर असणारे किडे शांत होत. नंतर किडे सक्रीय होत असल्याचे दिसून आले.
कोबीच्या झाडाला फूल लागले. परंतु ते फूल मोठे न होता पिवळे पडले आहे. तर झाडाची पाने करपून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. कोबीचे बियाणे नामांकीत कंपनीचे असून तिन्ही शेतकऱ्यांनी बियाने वरोरा येथील कृषी केंद्रातून घेतले होते. शेतकऱ्यांनी बियाने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा कंपनीच्या प्रतिनिधीनी पिकाला पाहणीसाठी भेट दिली. मातीमध्ये फरक असल्याने पीक करपले असल्याचे सांगत ते निघून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. (तालुका प्रतिनिधी)