मारहाण करणाऱ्या महिलेला अटक

By Admin | Updated: September 1, 2016 01:19 IST2016-09-01T01:19:37+5:302016-09-01T01:19:37+5:30

नकोडा ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरू असताना कार्यालया घुसून ग्रामविकास अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या ममता मोरे या महिलेवर

Busted woman arrested | मारहाण करणाऱ्या महिलेला अटक

मारहाण करणाऱ्या महिलेला अटक

ग्रामविकास अधिकारी व सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
घुग्घुस : नकोडा ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरू असताना कार्यालया घुसून ग्रामविकास अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या ममता मोरे या महिलेवर घुग्घुस पोलिसांनी भादंवी ३५३, २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
निवडणूक अधिकारी यांनी शौचालय नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकी दरम्यान उमेदवारी अर्ज अवैध ठरविला. या निर्णयाविरूद्ध नागपूर उच्च न्यायालयात अपील केली असता, न्यायालयानेही निर्णय कायम ठेवला. त्यामुळे संतप्त होऊन महिलेने मंगळवारी दुपारी नकोडा ग्रामपंचायतीची मासिक सभा तहकुब झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी ए.के. जेंगटे व सरपंच तनुश्री बांदुरकर कार्यालयात बसून असताना ममता मोरे हिने कार्यालयात प्रवेश करून मारहाण केली होती.
तर ममता मोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार दाखल केल्यावरून ग्राम विकास अधिकारी ए.के. जेंगटे व सरपंच तनुश्री बांदुरकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, यासाठी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून निवेदन दिले व चर्चा केली. दरम्यान ठाणेदार सुधाकर अंभोरे यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली. (वार्ताहर)

Web Title: Busted woman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.