बसचा अपघात टळला, विद्यार्थी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:46 IST2018-09-14T22:45:42+5:302018-09-14T22:46:09+5:30
विद्यार्थ्यांसह ९० प्रवाशांना ब्रह्मपुरीकडे घेवून येणाऱ्या कोलारी बसचे चाक निघाल्याने मोठा अपघात टळला. ही घटना चांदली गावाजवळ शुक्रवारी घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.

बसचा अपघात टळला, विद्यार्थी बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : विद्यार्थ्यांसह ९० प्रवाशांना ब्रह्मपुरीकडे घेवून येणाऱ्या कोलारी बसचे चाक निघाल्याने मोठा अपघात टळला. ही घटना चांदली गावाजवळ शुक्रवारी घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.
ब्रह्मपूरी येथून एमएच ४०-८२६२ क्रमांकाची बस दररोज कोलारी येथे जाते. या बसमध्ये प्रामुख्याने विद्यार्थी बसतात. ही बस ब्रह्मपुरीकडे परत येत असताना समोरील उजव्या बाजूचे चाक अचानक निघाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. परंतू त्याने मोठ्या कुशलतेने बसला सुरक्षित ठेवले. थोडी चूक झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. ब्रह्मपुरी येथून सोडणाऱ्या बरेच बसेस भंगार झाल्या आहेत त्यामुळे टायर फुटल्याच्या घटना सतत घडतात. हा प्रकार बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.