शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कचरा जाळून प्रदूषणाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:17 IST

चंद्रपूर महानगरपालिकेकडून सध्या स्वच्छता अभियानात धडाक्यात राबविले जात आहे. स्वच्छता अ‍ॅपला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद आहे. मात्र शहर स्वच्छ करताना रस्त्यावरील, मोकळ्या जागेतील कचरा तिथेच जाळून टाकला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे.

ठळक मुद्देमनपाचा अफलातून कारभार : स्वच्छता अभियानात प्रदूषण वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेकडून सध्या स्वच्छता अभियानात धडाक्यात राबविले जात आहे. स्वच्छता अ‍ॅपला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद आहे. मात्र शहर स्वच्छ करताना रस्त्यावरील, मोकळ्या जागेतील कचरा तिथेच जाळून टाकला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. आधीच प्रदूषित असलेले शहर यामुळे आणखी प्रदूषित होत आहे.‘चंद्रपूर शहर स्वच्छ होतेय’ असे ब्रिद सध्या शहरातील चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर झळकत आहे. ते खरेही आहे. सध्या महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान गंभीरतेने राबविले जात आहे. घराघरातून सुका आणि ओला कचरा वेगवेगळा संकलित केला जात आहे. नागरिकही याला चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरातील रस्ते, गल्लीबोळात नियमित झाडू फिरत आहे. या सर्व प्रकारामुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. मात्र या शहर स्वच्छ अभियानात मनपा प्रशासनाचे प्रदूषणाकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.आधीच चंद्रपूरचे प्रदूषण राज्यभर कुप्रसिध्द आहे. येथील प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होणे सुरू झाले आहे. त्यामुळे प्रदूषण कसे कमी करता येईल, यासाठी जिल्हा, मनपा, जि.प. प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु प्रदूषणाबाबत या प्रशासनाला काही देणेघेणे असल्याचे दिसत नाही. महानगरपालिकेने स्वच्छता अ‍ॅप तयार केले आहे.यावर नागरिकांच्या दररोज तक्रारी येत आहेत. एखाद्या ठिकाणी कचरा दिसला, प्लॉस्टिक डम्प करून दिसले की नागरिक त्याचे छायाचित्र स्वच्छता अ‍ॅपवर टाकून तक्रार करतात. या तक्रारीची मनपाकडून तातडीची दखल घेतली जात आहे. तत्काळ तेथे मनपाचे स्वच्छता कर्मचारी पोहचतात. मात्र तेथील कचरा उचलून डम्पींग यार्डवर नेण्याऐवजी तो तेथेच जाळला जात आहे. यामुळे प्रदूषण प्रचंड वाढत आहे. कचरा, प्लॉस्टिक जाळल्यामुळे होणाºया धुराचा नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. यासोबत वातावरणही प्रदूषित होत आहे. उल्लेखनीय बाब अशी की संपूर्ण शहरात सर्वत्र असाच प्रकार सुरू आहे. नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅपवर एखाद्या वॉर्डात कचरा आढळून येत असल्याची तक्रार करताच मनपाचे सफाई कामगार तेथे येऊन कचरा जाळून टाकतात. त्यात प्लॉस्टिकचाही समावेश मोठा असतो.नागरिकांनी जागृत व्हावेचंद्रपूरचे प्रदूषण वाढण्यामागे कोळशाचे जाळणे, शेगड्या पेटविणे, कचरा-प्लॉस्टिक जाळणे या बाबीही तेवढ्याच कारणीभूत आहेत. त्यामुळे नागरिकांनी याबाबत जागृत होऊन कचरा पेटवू नये. मनपाच्या सफाई कामगार तसे करताना दिसत असतील, तर त्याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी कराव्यात.पूर्वीपासूनच हीच पद्धतजमिनीवरील घाण हवेत पसरविण्याचा घाणेरडा प्रकार आजचा नाही. पूर्वीपासून असेच घडत आले आहे. पूर्वीही रस्त्याच्या कडेला, एखाद्या भिंतीच्या आडोशाला किंवा चौकाच्या एका बाजुला संग्रहित झालेला कचरा तेथेच जाळला जात होता. अनेकवेळा तर कचराकुंड्यातील कचराही जळताना पाहण्यात आले आहे. याशिवाय डम्पींग यार्डवरही अनेकवेळा कचºयाला आग लावण्यात येत होती. ही बाबच चंद्रपूरला प्रदूषित करण्याला कारणीभूत ठरली आहे.वरिष्ठांनी लक्ष देणे आवश्यककचरा, प्लॉस्टिक जाळून वायू प्रदूषण करण्याचा हा प्रकार गंभीर आहे. सफाई कामगारांना तसे सांगण्यात येत असेल तर तो प्रकार आणखी गंभीर आहे. मात्र सफाई कामगार आपल्याच मर्जीने शहरातील कचरा जाळत असतील, त्यांना आताच आवर घालणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.